पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४ ]

पाहण्याचा त्या नवराबायकोवर - त्रसुदेवदेवकीवर-प्रसंग योवाना ! तुरुंगांत आल्या. बरोबर कंसास काय दिसलें ? संध्याकाळचा समय झालेला होता. देवकी तान्ह्या लेकरास पाजीत होती ! पण त्या दुष्ट निर्दयास त्याची यत्किचिहि कीव न येतां त्यानें खसदिशीं तंगडी धरून तें लेकरूं देवकीपासून ओढलें व एखाद्या मांगासारखा तो त्या गोजिरवाण्या बालकास ठार मारण्यास प्रवृत्त झाला ! अरेरे ! यावेळीं एखाद्या फत्तराचा हातही लुला पडता ! देवकीचा तो करुणपूर्ण विलाप ऐकून एखाद्या पाषणासही पाझर फुटला असता ! पण वसुदेव देवकीच्या पहिल्या प्रीतीचें तें फूल कुसकरून-चुरगळून-- चोळामोळा करून फेकून देण्यास तयार झालेला कंस फत्तराहून फत्तर व मांगासहि लाजविणारा मांग होता ! त्याला कुठली दया यायला ? त्या अभागी दंपत्याच्या हृदयभेदक शोकानें सर्व चराचर सृष्टि विलाप करूं लागली. पण त्याचें त्या निर्दयाला काय होय ? त्यानें आपल्या पातकांची हंडी पुरोपूर भरण्यासाठींच की काय त्या तसल्या करकरीत तिनीसांजा झालेल्या अस तांनां त्या गरीब हंसऱ्या बालकाचा शिळेवर हापटून जीव घेतला ! वसुदेव-देवकीचा पहिल्या प्रीतीचा साक्षीदार देवाकडे " कंसाच्या निर्दयपणाची “ साक्ष द्यावयास गेला.” " संसाराच्या सारीपटांतला प्रेमाचा पहिला डाव देवगजाननाला दिला ! " वाचकांच्या हृदयास ह्या निर्दय प्रसंगाने धक्का बसला असेल. पण वस्तुस्थितीपुढें आम्ही तरी काय करणार ? वाचकांना यापुढे सहृदयत्वाच्या दृष्टीनें विशेष त्रास होणार नाहीं असे आम्ही आश्वासन देतो. यासाठी त्यांनी आपल्या शोकाकुल हृदयास कसेंबसें सांवरून आमच्या पाठोपाठ यावें. पण स्वातंत्र्याचा मार्ग सुखाचा नसतो. रक्तमांसांचा चिखल तुडविल्या / शिवाय स्वातंत्र्य मिळत नसतें हें रामायण व महाभारत ह्या दोन्ही कथा सांगतात. रक्तमांसचिखलाच्या पायावरच स्वातंत्र्याची इमारत उठत असते. पारतंत्र्यांतल्या हजारों हत्यांच्या पोटींच स्वातंत्र्य जन्मास येत असतें हैं त्यांनीं लक्षांत ठेवावें. इथेही तोच प्रकार झाला. देवकीच्या तुरुंगावर खडा पहारा रात्रंदिवस सारखा जागता ठेवून देवी प्रसूत झाली रे झाली कीं हा दुष्ट तिथें जाई व त्या गरीब अनागस लेकरास ठार मारीत असे. पोटच्या अर्भकांचे असे निर्दय खून पहाण्याचें त्या दंपत्याच्या नशिबी यावें याहून खडतर दैवविलसित तें कोणचें असणार ?

 याप्रमाणे होतां होतां सहा पुत्र मारून झाले. कंसाचा मृत्यु जन्मास येण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. एक एक दिवस लोटे तो कंसाच्या हृदयाचा थरकांप