पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २४ ] 66 66 पाहूं लागली. नंद यशोदा दोघेही परसांत येऊन पहातात तो दोन अर्जुनवृक्ष उन्म- कून पडले आहेत व बाळकृष्णाची श्यामसुंदर मूर्ति दाव्याउखळीसकट पलीकडे हंसत बसली आहे ! “ हे काय ग ! याला या दाव्यांनी कोणीं ग बांधले ? ” नंदांनी आवर्यानें प्रश्न केला. कारण नवऱ्याला नकळत, नंदाच्या पश्चात्, तो बाहेर गेला असतांना इकडे यशोदेने कृष्णास ही शिक्षा केली होती ! “ भारीच गुलाम खोड्या करीत होता म्हणून ठेवलें होतें बांधून उखळीला घटकाभर !" यशोदा म्हणाली. अग पण हो. म्हणून काय झाले ? त्याला ही शिक्षा ? आत्तां तो त्या झाडाखाली सांपडता म्हणजे पोर दगावताना ? देवांनीं ( 1 ) खैर केली म्हणून थोडक्यांत बचा- वलें. छे ! छे ! तुम्हांला बायकांना अगदी सुमारच नसतो कोणच्याही गोष्टीचा म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. " यशोदेचा अपराध होता खराच. तेव्हां ती काय बोलणार ? “ हूं चल, सोड त्याचें दावें. बाळाचें सुकुमार अंग त्यानें करकचून सुद्धां गेलें असेल ! लोक मुलं होत नाहीत म्हणून देवाला नवस करतात अन् पिंपळाचे • पार झिजवीत असतात. पण देवाच्या दयेनें हिला कसा सुंदर गोजिरवाणा मुलगा मिळाला असून हिला आहे का त्याची कांहीं किंमत ? " असे कृष्णप्रेमानें म्हणत नंदानीं स्वतःच बाळकृष्णाची त्या दामबंधनांतून सुटका केली ! पस्तावलेली यशो- दाही " कृष्णा, मी तुला आतां कर्धी अशी शिक्षा करणार नाहीं " असें म्हणाली व त्याचें चुंबन घेऊन त्या माउलीनें त्यास प्रेमानें पोटाशी धरलें व त्यास ' प्रेम- पान्हा ' दिला. याप्रमाणें आमचे कृष्णजी पुन्हां खोड्या करायला मोकळे झाले ! " 66 17 यशोदेला श्रीकृष्णानीं आपलें परमात्मत्व एक दोनदां पटवून दिलें होतें म्हणून मागें सांगण्यांत आले आहे; ते प्रसंग असे :- एकदां श्रीकृष्णांनी माती खाल्ली होती. तेव्हां " माती खातोस का ? थांब हं. तुला मार दिला पाहिजे " म्हणून यशोदेन त्याचा हात पकडला. तेव्हां " नाहींग आई, ही पहा मीं कुठें माती खाल्ली आहे ? अर्से म्हणून देवानीं आपलें तोंड उघडलें व त्यांत चौदा भुवनें-- सर्व विश्व दाखविलें. तेव्हां यशोदा थक्कीत झाली ! तसेंच दुसऱ्या एका प्रसंगीं चतुर्थीच्या दिवशीं गणपती- साठ करून ठेवलेले मोदक व लाडू कन्हय्यालालानी चटकावले असतांना तिला ते उमगले नाही व ती शिक्षा करण्यास प्रवृत्त झाली असतां पुन्हां विश्वदर्शन करून त्यांत हजारों गणपति त्या मुखांत बसलेले तिला त्यांस दाखवावे लागले. नामदेव ह्मणतात “ कृष्णनार्थे तेव्हां मुख पसरिलें । ब्रह्मांड देखिलें मुखामाजी | असंख्य गण- पति दिसती वदनीं । पहातसे नयनीं यशोदा ते । मुखांतून गणपति मातेसी बोलत 1