पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५ ] पुजावें त्वरित हरीलागी " पण साफ झालेल्या पाण्यावर पुनः पुनः " बाभुळी शेवाळें—वाढावें तर्से तिच्या निवळलेल्या दृष्टीवर पुनः पुनः मायेचें पटल पडत असे अथवा प्रभु ते घालीत असत ! आणि म्हणूनच अशा प्रकारानंतर " यशोदा हरीसी कडेवर घेत । मुखातें चुंबीत आवडीनें " असाच वारंवार प्रकार घडे. असो. याप्रमाणें श्रीकृष्ण ६ळुहळूं सहासात वर्षांचा झाला तेव्हां तो गवळ्याचा पोर असल्यामुळे " तुला झालें तर पहा " असे म्हणून नंदानें आपल्या येथील गाईवांसरांना रानांत यमुनेच्या तीरीं चरावयास नेण्याचें काम त्याला सांगितलें. गोपालकृष्णांना गोपालन ते काय सांगायला पाहिजे ? सका झाली-- " रविचक्र निघो आलें-- " " सुंदर उषःकाल झाला " - कीं यशोदेनें आपल्या प्रिय बालकांस उठवावें-- हाक मारून जागे करावें. " कृष्णा ! इतका वेळ निजलासी म्हणुनि हरि कळेल नंदाला. " तर ऊठ लवकर. त्या पहा गोपी सडासंमार्जन करून रांगोळी घालून 66 66 या शृंगार सुशोभित " अशा यमुनाजल आणण्यास निघाल्यासुद्रां. " पलांडु मर्दुनि तिखट बनविलें घेइ शिदोरी बांधली. " हे पहा, तुझे सवंगडी तुला हांक मारायला आले आहेत. ” असें म्हणून यशोदेनें कांबळी, यष्टि, वहाणा इ. त्याला द्यावें. प्रमाणें श्रीकृष्णाची स्वारी गोधन सोडून रोज त्यांना वनांत चरायला नेत असे. त्या वेळेस वनांत-- कुंजवनांत गवत मुबलक असे. त्यावर यथेच्छ चरून जवळच अस लेल्या यमुनेचें जल प्राशन करून गायी पुष्ट बनत व त्यांच्या गोरसावर व्रजांची स्थितिही स्पृहणीय असे. दुर्योधन दुष्ट असूनही त्याची राज्यव्यवस्था जशी चांगली होती असे म्हणतान तसेच कंस इतका दुष्ट होता तरी त्याच्या राज्यांत " रिझ- हेड फॉरेस्ट लॉज " म्हणजे ' राखीव जंगलांचे नियम ' नसत. त्यामुळे गायी चार- ण्यास कोणच्याही तऱ्हेचा त्रास नसे. 6 हळुहळू ' रामकृष्ण ' दहाबारा वर्षांचे झाले. नीलवस्त्र परिधान केलेला ' गौरांग राम व पीतवसनधारी श्यामसुंदर कन्हयालाल यांची जोडी गळ्यांत वनमाला घालून, डोकीवर मोरपिसांचे मुकुट लेवून, आणि हातांत काठ्या घेऊन जेव्हां गायी चारण्यास जात तेव्हां सशक्त, सुंदर, सुहास्य वदनाच्या त्या रामकृष्णांच्या मूर्ति किती शामत असतील-- त्यांतल्यात्यांत कृष्णाच्या लोभनीय मूर्तीकडे पाहून गोकुळवासी गोपगोपींची दृष्टि किती लुब्ध होऊन जात असेल याची वाचकांनीच कल्पना करावी ! 99 पण त्याचें आमच्या कंसाला काय ? त्या दुष्ट कंसास वाचक विसरले नसतीलच... व तो कंसही श्रीकृष्णाला विसरला नव्हता. यद्यपि पूतना, माचळभट इत्यादिकांच्या