पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७ ] 6 " 6 चाला ' 6 चाललें. शेव सूर्य मध्यान्हीवर आल्यावर श्रीकृष्णांनी सर्व गाईवांसरांस झाडांच्या • सावलीत आणलें. व मग नदीकाठी असणाऱ्या एका प्रशस्त वृक्षाच्या घनदाट छार्येत बसून सर्व सवंगड्यांसह त्यांनी आनंदाने भोजन केले. ती श्यामसुंदर मूर्ति भोज- नास बसली त्या वेळचा आनंद काय वर्णावा ? नादब्रह्मानें सर्व जगास झुलवणारी आपली ' वंशी '-- मुरली-चेकूचा पांवा श्रीकृष्णांनी कंबरेस खोंदला, डाव्या कार्खेत शिंगाजवळ आपली सुंदरशी ' वेताटिही गोमटी' -- सुंदरशी वेताची छडी-ठेवून दिली व चंदनाची उटी ज्याच्या सर्वांगास लावली आहे, ' घवघवीत पिवळा पाटोळा' ज्यानें नेसला आहे, मयूर पिच्छाने युक्त अस। देदीप्यमान किरीट ज्याच्या मस्तकीं

शोभत आहे, वैजयंतिमालिका ज्याच्या गळ्यांत रुळत आहे, 'मकरकुंडलें' ज्याच्या

श्रवणीं तळपत आहेत-कानांत झळकत आहेत असा तो 'मनमोहन मुरली- श्रीकृष्ण--सर्व जगाला वेड लावून सोडणारा तो कन्याश्याम ज्यावेळी भोजनास बसला व त्यांनी जो आनंद लुटला त्याचे कोठवर वर्णन करावे ? प्रभूचें ते॑ चंद्रवदन पहाण्यास 'सर्वदृष्टी ' सदा 'भुकेल्या ' असत--त्यांच्या वदना- वर त्या नेहेमी खिळलेल्या असत, यासाठी, त्या सर्वचकोरास चंद्रदर्शन होण्यासाठी प्रभूनी आपले आसन मध्यभागी 'कर्णिकेच्या स्थळी '-- मांडलें व आपणांभोवती — अंभोज पत्रां' प्रमाणें-- कमलदलाप्रमाणें - सर्व मित्रसेना अर्ध चंद्राकार बसवली व परमेश्वरानीं दहीभाताचे घांस मोठ्या प्रेमानें प्रत्येकाच्या तोंडांत घातले. अहाहा ! ह्या सुखाचा हेवा कोणास वाटणार नाहीं ? त्या परमानंदाचें कौतुक किती सांगावें ? ज्या प्रभूच्या कृपेचा लवशेष मिळावा म्हणून योगजन हाडांचीं कार्डे करीत असतात, ब्रह्मादि देव ज्या सुखासाठी तळमळत असतात, त्या प्रभूचें सहवाससुख व कृपा आज गोकुळावर वर्षत आहे तेव्हा त्यांचा ' पुण्यलेखा ' कोणीं करावा ? धन्य धन्य त्या गोपी कीं ज्यांनीं करतालिका वाजवून प्रभूला 'एक पाय नाचिव रे गोविंदा । घाग- न्याच्या छंदा' म्हणून नाचविले व पुढे त्याच्या अखंड सहवासाचे अलौकिक सुख अनुभविलें; तसेंच धन्य तीं गोपाळबाळें कीं ज्यांच्या प्रेमानीं वेडा होऊन-ज्यांच्या भोळ्या भावाला भुलून परमात्मा अहर्निश त्यांच्याबरोबर हंसला - खेळला - व बोलला, " त्या वर्नात त्या भोजनाचा तो दिव्य आनंद दृष्टिसुखानें लुटण्यास आकाशांत देवांची दाटी झाली व आजूबाजूंचे योगी व तपस्वी यांची झिम्मड उडाली " हे साहजीकच आहे. ज्या प्रभूच्या नामानें व ध्यानानें अजूनही जवि वेडेपिसे होतात त्या प्रेममयाच्या सगुण मूर्तीचा सहवास किती 6