पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २९ ] म्हणतात. अस्तु. त्या कालियाची गोष्ट ज्या वृंदावनांतील यमुनेच्या डोहांत घडली त्या वृंदावनाकडे आपण आधीं थोडक्यांत वळूं. हंसाप्रमाणे नित्य नव्या हिरव्या गवताच्या ठिकाणी घोषांनी फिरावें यांतच जंगलांतलि गौळवाड्याची सर्व प्रकारची मौज अशा काव्यकल्पनेची समजूत अस णाऱ्या नंदगोपांनी वरील गोष्ट झाल्यावर कांही दिवसांनी आपला सुटसुटीत गौळवाडा तेथून हलवला व समुद्रवीचीप्रमाणे उसळत जाणारें तें गोकुळ वनवैपुल्य अस- •लेल्या तत्कालीन आर्यावर्तीत उत्तरेकडे जातांजातां लवकरच 'वृंदावन' नांवाच्या एका नवीन वनांत येऊन लागले व तेथील शेंकडों कुरणे, कदंबवृक्षराजि, नंदनवनांतील मंदारसदृश अशी गोवर्धन पर्वतशिखरें, घनदाट छायेचा ' भांडीर - वृक्ष, तो यमुनेचा मध्यवर्ती प्रवाह व शीतल वायूच्या त्या सुमंद झुळका याने संतुष्ट होऊन तें तेथेंच स्थिर झालें. ग्रीष्मऋतु सुरू असल्यामुळे आपल्या सर्व प्रेमळ सवंगड्यांसह गाई चरावयास नेणारे 'रामकृष्ण' तेथील मधुर अशी कंदफळे भक्षण करून यमुनेचें थंडगार उदक प्राशन करीत, यमुनेंत वारंवार उउया टाकून जलक्रीडेचें दिव्य सुख अनुभवीत, भांडीर वृक्षाखालीं कांही वेळ विश्रांति घेत तृणशय्येवर पडून पुन्हां हुतुतु, हमामा, विटीदांडू, कुस्त्या, झुंज, इत्यादि खेळ आपल्या सवंगड्यांशी खेळण्यांत दंग होऊन जात व सायंकाळ झाला कीं गोधनें घराकडे वळवून सर्व मंडळींसह तो मदनमोहन भगवान् आपल्या मधुर बांसरीतून संगीताचे आलाप छेडीत घरी परत येत असे ! याच वेळीं रामकृष्णांचें सात वर्षांचें बाल्य व चौदा वर्षापर्यंतचें कौमार्य संपून त्यांनी पौगंड दर्शत - तारुण्याच्या नव्या नवाळींत पाऊल टाकलें होते - " यौवनाच्या देहलीवर " ते उभे राहिले होते. व त्यामुळे " बाल्याच्या कंठीं हात ठेवून तारुण्य काननांत " विहरणाच्या त्यांच्या आधीच सुंदर व सदृड शरीरयष्टीस अधिकच मोहकत्व साहजी- कच प्राप्त झाले व त्यांच्यावर नजर ठरेनाशी झाली. अद्वितीय कांतीनें झळकणाऱ्या त्यांच्या मुखारविंदाकडे पहातां पहातां - त्यांतल्या त्यांत कन्हय्याच्या सौंदर्याचें दिव्य मोहनानें विमोहित झालेल्या सर्व गोकुळाची स्थिति कशी बेभान होत असेल, नंद- यशोदेच्या हृदयांत वात्सल्याचें भरतें किती दाटत असेल, आबालवृद्ध गोपगोपींस त्याचें व त्याच्या मोहक मुरलीचें कड़ें वेड लागून गेलें असेल व नंदगोपसुतं देवि पतिं मे कुरु जन्मनि " म्हणून शेंकडों गोपकुमारी देवीकात्यायनीजवळ कशा अनन्य भावें प्रार्थना करीत असतील या रम्य कल्पनेचें चित्र वाचकांनींच स्वतांश रेखाटून