पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३० ] घ्यावें. षण ह्या सर्वोची दृष्टि फिरवून टाकून त्यांस अध्यात्म्याच्या दिव्य वातावरणांत घेऊन जाणारे-नेऊन सोडणारे चमत्कार याच वेळीं प्रभूनी केलेले आहेत. त्यांतील हृदय हलवून सोडणारा प्रसंग म्हणजे कालियामर्दनाचा होय. " कालिया आख्यान स्मरे जो मानसीं । न डंखी तयासी सर्पकुळ " अशी नामदेवांनीं त्याची ' फलश्रुति सांगितली आहे; तेव्हां आम्ही सांगतों ती कालियाची कथा, प्रियवाचक, तुम्ही. " करुनि एकाग्र मन ऐका " " " “ कालिंदीचे डोहीं ” कालिया नांवाचा भयंकर विषारी व अजस्र असा एक सर्प रहात होता. त्याचें विष इतकें भयंकर होतें कीं त्याच्या विषारी फूत्कारांच्या ज्वालांनीं यमुनेचें पाणी नुसतें कढत होते व त्या पाण्याच्या त्या विषारी वाफेनें एकएक दोनदोन मैल उंचावरील पक्षीसुद्धां पटापट मरून त्या यमुनेच्या डोहांत पडत असत. पाणी प्यावयास जाणारी गाईवांसरें त्या पाण्यास तोंड लावल्याबरोबर गतप्राण होऊन पडत असत. " पक्षश्वापदांनीं सोडिलें त्या स्थळा | निघताती ज्वाळा तया डोहीं || विषाचिया योगे झाडे जळताती । जीवन न घेती कोणी त्याचें " असा हाहाकार त्या डोहाच्या आसपासच्या सृष्टींत सुरू असतांना व एकच कहर माजला तेव्हां त्या दुष्ट सर्पाचें शासन करणें जगद्वितार्थ अवतरलेल्या प्रभूकडे साहजीकपणे आलेंच, व त्यांनीं तो प्रसंगहि मोठ्या बहारीनें जुळवून आणला. तो असा कीं श्री- कृष्ण प्रभूची स्वारी एकदां त्या स्थळीं गायी चारण्यास म्हणून आपल्या गोपालसवं- गड्यांसह आली. व गाईवांसरांस चरायला सोडून हुतूतू, हमामा, लपंडाव इत्यादि खेळ खेळण्यास सर्वांनीं सुरवात केली. खुद्द वैकुंठनायक आपल्या बाकड्या, द्या इत्यादि मित्रांसह विटीदांडूचा खेळ खेळत होते. कालियाच्या वस्तीचें भान त्या परमात्म्यावांचून इतर कोणासच नव्हतें. डाव ऐन भरांत आले होते. ग्रीष्मऋतूंतला प्रखर सूर्य आपल्या चंडकिरणांनी प्रकाशत होता. हळुहळु “ तृषाक्रांत झाले ते गाई-गोपाळ। पिती तेव्हां जळ काळीयाचें " त्याबरोबर " झाले गतप्राण सकळां- चे ! " विटीदांडूच्या खेळांत रंगलेल्या वैकुंठनायकाची दृष्टि त्यांजवर गेली व “ लहानली मुलें नाहीं तया ज्ञान " अशा अनागस बालांचें व गाईवासरांचे ते मृतदेह पाहून प्रभु हृदयीं कळवळलें व क्षणक थांबून नामा म्हणे तेव्हां कृपादृष्टी पहात । उठवी समस्त गाई गडी. " इकडे विटीदांडूचा खेळ सुरूच होता. पण मनांतल्या मनांत " जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांती तुझी आतां ॥ मा- झिया लेकरां दिधलासी त्रास । करीन मी नाश आतां तुझा | माझिया भक्तासी 66 66