पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३१ ] 66 जो कां दुःखदाय । करीन प्रळय त्याजवरी " असे रागाचे विचार श्रीहरीच्या मनात येत होते व त्याबरोबर " स्फुरताती दंड कांपती अधर " असें तें प्रभूचें क्रोध- कंपित ध्यान शोभत होतें ! पण वरकरणीं तसें कांहींच न दाखवितां खेळतां खळता प्रभुनीं वाकड्याची विटी अगदी सहज अशी त्या डोहांत पाडली व ती आणून दे- ण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण ताबडतोब त्या डोहाकडे धांवले. आपल्या पिवळ्या झग- झगीत पितांबराची कांस मारून ते झरझर त्या डोहाकाठी असणान्या कदंब वृक्षावर चढले व आंतल्या रागानें खवळून जाऊन दुष्टदमनार्थ तयार झालेल्या त्या प्रभूनीं दंड थोपटून डोहांत उडी टाकण्याची तयारी केली व वाकड्या ! ही पहा मी तुझी विटी आणून देतों हं ! " असे म्हणून प्रभून धादिशीं त्या डोहांत उडी सुद्धां घेतली ! हा सर्व प्रकार इतक्या जलद--क्षणार्धीत - डोळ्याचें पाते लवतें न लवतें इतक्या अल्प काळांत झाला की वाकड्या, पेंद्या इत्यादि प्रभूच्या सवंगड्यांस त्यांच्या पाठोपाठ धोवून त्यांना या भयंकर सा सापासून परावृत्त करण्यास त्यांना पुरता वेळही मिळाला नाहीं ! तरी त्यांतल्या त्यांत वाकडया " नको नको कृष्णा ! हें साहस करूं नको ! मला ती विटी नको, मी दुसरी आणीन " असें म्हणून प्रभु- च्या पाठोपाठ धांवलाच. पण तो त्या कदंच वृक्षाजवळ जाऊन पोचतो तो प्रभूनों आंत उडीसुद्धां घेतली होती ! आतां काय करणार ? कोण तो भयंकर प्रसंग ! केवढे हें साहस ! सर्व सवंगडी हताश होऊन त्या डोहाचे कांठीं जमले. " घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला ॥ गडी रडताती वत्सें पडताती । "" या प्रमाणे सगळीकडे हाहाकार उडाला. वियोगाने तेव्हां पक्षी रडताती । आतां कृ- मूर्ति कैची आम्हां ॥ बोलोनियां ऐसे निस्तेज पडती । नद्या वाहती त्या स्थिरा- वल्या ॥ " इकडे गोकुळांत - वृंदावनांत वसलेल्या गोकुळांत-व्रजांत- यशोदेची अव स्था दुश्चिन्ह परंपरेनी फार चमत्कारिक झाली. "कधि भेटेल मजला श्रीहरीं" असें तिला होऊन गेलें. " जीव तळमळी दाटे माझा घास | पाहीन पाडस केव्हां आतां " अर्से तिला झाले व तिच्यासकट सर्व गोपगोपी कृष्णशोधार्थ निघाल्या. व येऊन पहातात तो दुःखानें विव्हळ होऊन कन्हय्याचे सवंगडी त्या डोहाचे तीरी पडले आहेत व ती एकली श्यामसुंदर मूर्ती मात्र कोठें दिसत नाहीं ! ते पाहून नंद यशो- देनीं जो हृदयभेदक विलाप केला आहे त्याचे वर्णन कोठवर करावें ? " धांव धांव कृष्णा दावीरे वदना । पाजूं आतां पान्हा कोणालागीं ॥ तुझिया कौतुकें कंठीं मी संसार | जळतें अंतर तुजसाठीं ॥ नामा म्हणे शोकें जाऊं पाहे प्राण | सकळांचे 66 -