पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३४ ] e अशी त्यास जरब देऊन, तसेच “ ज्या गरुडाच्या भीतीनें तूं इथे येऊन राहिलांस तो ' तुझिया मस्तकी असती माझे चरण ' म्हणून तोही तुला आतां खा नाहीं तूं कांहीं काळजी करूं नकोस " असे त्यास आश्वासन देऊन व त्यांच्या नाकांतली वेसण काढून घेऊन त्यांनी त्यास तेथून काढून लावला ! व आपण नदी- कांठीं उडी घेतली ! तेव्हां सर्वोनी आनंदानें त्यांना कडकडून भिठ्या मारल्या; नंद- यशोदेनीं त्याला जवळ घेऊन त्याचे मस्तक अवघ्राण केलें; म्हाताच्या बायांनीं त्या- 66 वरून लिंबलोण उतरलें; व लहान थोर सर्व गोपगोपींच्या व गाईवासरांच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहूं लागले ! गाई धांवताती । कृष्ण - अंगातें चाटिती ॥ " यापेक्षां त्या आनंदाच्या प्रसंगाचें आम्ही जास्त काय वर्णन करणार ? कारण तो आनंद । नामयाची बुद्धि मंद. " न वर्णवे यानंतर रानगाढवांच्या कळपांत गर्दभाचे रूपानें फिरणान्या धेनुकासुरास व त्याच्या हस्तकास रामकृष्णांनी ठार मारून रानांतला तो भाग त्यांनी निर्भय केला. तसेंच ' प्रलंब ' राक्षस ' रामा 'स पाठीवर घेऊन पळून जात असतां रामांनीं त्यास असा एक सणसणीत मुष्टिमोदक चारला की त्याबरोबर तो राक्षस तत्काळ गतप्राण होऊन पडला. तेव्हांपासून आमच्या रामास ' बलराम ' हे नांव प्राप्त झालें. 6 66 तसेंच एकदां वृंदावनांतील जंगलांत-अरण्यांत उन्हाळ्याच्या दिवसांच्या भयंकर उष्णतेमुळे एकदां भयंकर वणवा लागला व त्यांत गाईवांसरासुद्धां सर्व सवंगडी जळून भस्म होतात की काय अशी स्थिति येऊन पोचली. तेव्हां सर्व सवंगड्यांनीं श्रीकृष्णाची - त्या दीनदुनियेच्या जादुगाराची - प्रार्थना केली की कृष्णा ! यांतून वांचवणारा आतां तूंच काय तो समर्थ आहेस !" तेव्हां कृष्णांनीं त्यांना डोळे मिटून घेण्यास सांगितलें व आपले विराट रूप धारण करून तो सर्व दावाग्नि पिऊन टाकला ! काय हा प्रताप ! व व हळुहळं पावसाळा सपूंन शरदृतु सुरू झाला. पांढऱ्याकाळ्या फुलांची बहार, केव- उद्याचा घमघमाट, हंससारसांचे थव्यांची यमुनातीरावरील शोभा, ती पिवळीं धमक कणसे व ते जलहीन शुभ्र मेघखंडांचें इतस्ततः आकाशोद्यानांतील भ्रमण यांची अलौकिक शोभा वृंदावनांत कांहीं काळ भरून राहिल्यावर लवकरच कांहीँ दिवसांनीं शरतूच्या प्रारंभीच नित्याप्रमाणे पाणी देणाऱ्या 'मेघराजा' ची आराधना करण्या- साठी त्या व्रजांतील गवळ्यांनी शक्रोत्सवाची तयारी केली. पण ज्याची जी वृत्ति असेल त्यानें त्याचें पूंजन करावें. तेव्हां आपण गाईचें व प्रथम त्यास आधार-