पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. → Ah- 7- . आम्हांस आतां एका अत्यंत महत्त्वाच्या कृष्णचरित्रांतील अत्यंत रम्य अशा भागाचें म्हणजे श्रीकृष्णाच्या सौंदर्याने, मुरलीनें, व प्रेमानें सर्व गोकुळास- विशेष- करून सर्व गोपींस- कसें वेड लावून सोडलें होतें त्याचे वर्णन करावयाचें आहे, पण विसाव्या शतकांतील आमची काव्यदृष्टि इतकी हरपली आहे, अत्यंत उच्च व रमणीय अशा परमेश्वरी प्रेमकल्पनेस आह्मी इतके पारखे झालों आहों, व पारमार्थिक ज्ञानाचा सांठाहि आमचा इतका क्षीण झाला आहे कीं, याच प्रेमाच्या दिव्य मोहनाचें संगीत आम्हांस ऐकूं येईनासें झालें आहे - त्याऐवजी आम्हांस बदसूर ऐकूं येऊं लागले आहेत, त्या सौंदर्यविलासाचें- प्रेमतन्मयतेचें तें रमणीयं चित्र आमच्या काव्यमय चक्षूंस न दिसतां त्या जागीं आम्हांस व्यभिचाराचें हिडिस चित्र दिसूं लागलें आहे; तेव्हां त्याचें प्रथम निराकरण करून मगच आपल्या रम्य विषयांत शिरावे हें बरें. 19 66 बरील तऱ्हेनें आमची दृष्टि आकुंचित व विकृत झाल्यामुळेच आम्हांस एका कृष्णाचे ऐवज दोन कृष्ण-- रासक्रीडा करणारा एक व गीता उपदेशिणारा दुसरा- असे वेगळाले कृष्ण दिसूं लागले आहेत. पण त्या गीता उपदेशकानेंच " सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज " मग त्यांत कितीही " पापें " झाली तरी " अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः अशा तऱ्हेचा उपदेश केला आहे हे त्या आपल्याच डोळ्यांत बोट घालून “ एकाच तीं दोन " करणाऱ्या गृहस्थास ठाऊक नाहीं काय ? परमेश्वरप्राप्तीच्या मार्गात अधर्माचें आचरण झाले तरी क्षम्य आहे, नव्हे धर्म्य आहे, हें पारमार्थिक तत्त्व यांना ठाऊक नाहींसें दिसतें. कायद्याचा भंग करण्यानेंच कधीं कधीं खऱ्या कायद्यांचें योग्य परिपालन होत असतें हैं अमेरिकन तत्त्ववेच्या थोरोचें बचन- या गृहस्थांनी नीट लक्षांत घ्यावें. कारण सर्व धर्माधर्माचें परिपालन तरी कशासाठी करायचें ? एको परमेश्वरप्राप्तीसाठीच ना ! मग तोच परमेश्वर जर प्राप्त होत आहे तर मसेनी कई लौकिक धर्मावर लाथ मारली, त्यांचा त्याग केला, नव्हे लौकिकी भाषेत बोलावयाचें तर अधर्माचा अवलंब केला तर त्यांत कोठें चुकलें ? यासाठी कृष्णाच्या अद्वैतत्वाची गोडी त्यास