पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३७ ] एकाचे ठिकाणीं दोन कल्पून यांनी कमी करूं नये. कारण त्याने किती रसहानि होते याची त्यांना कल्पनाही नाही असे दिसतें. पण इतकी सगळी यातायात करावयाची कशासाठी किंवा काय म्हणून ? तर कृष्णगोपींच्या व्यवहारांत व्यभि- चार झाला म्हणूनच ना ? पण त्या व्यवहाराकडे ज्या काव्यमय, उच्च व रसिक दृष्टीनें पहावयास पाहिजे त्या दृष्टीनें तें पाहिले गेले नाही म्हणूनच हा घोटाळा माजला आहे. या कामीं बुद्धीची भयंकर दिशाभूल झालेली आहे- किंबहुना येथें 66 66 कांहीं बुद्धीचें काम नसून हृदयाचें-सहृदयत्वाचें काम आहे. त्या हृदयाच्या उच्च भराराँत रासक्रीडेसारख्या प्रसंगाचें बहारदार वर्णन चालू असतां त्याच उंचीवर आरोहण करून एखाद्या चंडोलाप्रमाणें त्याशीं समरस होण्याची अंगांत ताकद नसल्यामुळे खुद्द परीक्षितीची या काम दिशाभूल होऊन खुद्द भगवान् असें जिगुप्सित कर्म कसे करते झाले ? " असा अरसिक प्रश्न त्यानें शुकाचार्योस केला आहे व त्यांनीं ज्या व्यावहारिक दृष्टया प्रश्न केला त्याच दृष्टीनें “ तेजीयसां न दोषाय वन्हेः सर्व- भुजो यथा " असे उत्तर देऊन शुकांनी त्याचें समाधान करून ते पुढे चालले आहेत. वास्तविक वरील परीक्षितीचा प्रश्न व शुकांचें उत्तर ही दोन्हीहि मागाहून कुणी तरी मुळांत दडपली असण्याचाही संभव आहे. कारण अशा तऱ्हेनें जुनीं पुस्तकें- जुने ग्रंथ - हाताळण्याची तन्हा आपण महाभारतांत पाहिलच आहे. पण असले तरी या काम भयंकर दिशाभूल झालेली आहे ही गोष्ट खास. व ज्यांच्या कल्पनेची भरारी तितकी उंच जाऊन पोचत नाहीं, रसिकता, काव्यमयता, सहृदयत्व, आध्यात्मिक उच्चता, इत्यादि गोष्टींत जे जमिनीवरूनच सरपटत आहेत अशाच बहुतेकांनी हा विपर्यास केला आहे. त्या काम बाह्य देखावा तसाच भूल पाडणारा- चकवणारा असेल; पण अशा देखाव्यांतूनच - अशा ' मायेच्या बाजारांतूनच - • अंतरंगांत ' बुडी मारावी लागत असते ! तशी न मारतां वरच्याच गोष्टीला फमून जाऊन वरील परीक्षितीसारखी समजूत करून घेणें है चूक होणार आहे — रंगभूमी- वर स्त्रीपार्टीत सजून आलेल्या एखाद्या पुरुषास स्त्री समजून तिला कवटाळण्यास धांवण्यासारखे आहे- रा. पांगारकरांच्या भाषेत बोलावयाचें तर सापसाप म्हणून भुई धोपटण्या " सारखें आहे ! पण कृष्णगोपींच्या रासक्रीडेस रूपक म्हणणारांची जशी ती स्थिति आहे त्याचप्रमाणें कृष्णांनी गोपींशी व्यभिचार केला असे समज- णारांचीही तीच व त्याहूनही अक्षम्य चूक आहे. प्रत्यक्ष भगवंतांच्या बाबतीत अशा प्रकारची कल्पना करणारांची खरोखर धन्य आहे, यावांचून दुसरे काय म्हणायचे ? "(