पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[[ ३८ ] 6 पण खुद्द भगवान् अर्से कर्म कसें करतील यांचा जन्यानव्या लेखकांपैकी फारच थोड्यांनीं विचार केलेला दिसतो. तसेंच आम्हांस हेंही सांगितले पाहिजे की, जर .श्रीकृष्णाच्या व्यभिचाराची गोष्ट निव्वळ काल्पनिक व भ्रामक नसेल-पण ती का• ल्पनिक व शुद्ध भ्रामक आहे अशीच आमची ठाम समजूत-नव्हे खात्री आहे- व वरील परीक्षितीचा प्रश्न व शुकांचें उत्तर हें जर खरे असेल म्हणजेच कृष्णाचें जुगुप्सितकर्म जर खरे असेल तर मात्र त्यावरील शुकांच्या उत्तरानें परीक्षितीचें व त्याजबरोबर इतरांचेंहि कोणाचें समाधान झालें असेल ते असो पण आमचें मात्र त्यानें समाधान होत नाहीं हे आम्ही स्पष्ट कबूल करतों; किंबहुना अशी असमाधानाची स्थिति ह्या कृष्णावरील आळासंबंधी आमची कित्येक दिवस -- कित्येक महिने - कदाचित् कित्येक वर्षे असतांनाच आम्हांस एका सुप्रभातीं हैं कोर्डे त्याच दयामय व प्रेमळ प्रभूच्या कृपेनें सुटलें-उलगडलें व आम्हीं तें तत्काळ पद्यांत लिहूनही काढून आमच्या मित्रांस दाखविलें व त्यांलाहि तें वाचून आनंद झाला. अस्तु. हा आमचा उलगडा आम्हीं पुढे दिलाच आहे; पण त्याचा थोडक्यांत निष्कर्ष हाच कीं गोपिकांच्या मनानें श्रीकृष्ण पति वरिले होते. अत्यंक शुद्ध नैतिक दृष्टीने पाहतां अशा तऱ्हेचा मानासेक ' व्यभिचार ' हा सुद्धां " शास्त्रप्रवृत्तिविरुद्ध " च आहे ही गोष्ट खरी; किंब- हुना गोपींच्या ठिकाणीं " कामासक्ती " चें वारें प्रथम होते हेही खरें. पण गोपच्याकडूनसुद्धां शारीरिक व्यभिचारासाठी धडपड झाली किंवा नाहीं याची सुद्धां , थोडीशी शंकाच आहे; तथापि झाली अर्से जरी धरलें तरी प्रभूंनीं त्यांच्या त्या ' दुरासद कामरूप शत्रूस ' कांहीं निराळ्याच प्रकारें ठार मारले आहे. विठ्ठलाचा नामधारक भक्त नामदेव ह्याची प्रथमची सगुण भक्ति इतकी दांडगी असूनही तें “ कच्चें मडकें " कसें होतें हैं आपणास ठाऊकच आहे. त्याच न्यायानें गोपींना जो काम-ज्वर ' बाधला त्याचे कारण 'अद्वैताज्ञान' हेच होय - विश्वव्यापक परमात्म्याची उच्चभक्ति त्यांच्या ठिकाणीं बाणायची होती; व ती रासक्रीडे- सारख्या प्रसंगीं ईश्वरांनीं बाणवून त्या उच्चसुखांत त्या गोपींस प्रभूंनी कसें नेऊन सोडलें हें आम्ही पुढे सविस्तर वर्णिलेंच आहे. पण ह्या मानसिक व्यभिचाराचे बाब- तीत मात्र आम्हांस एवढेच म्हणायचें आहे कीं, एवढी अनीति, एवढा अधर्म कोणाही स्त्रीनें वाटल्यास करावा अशी त्या कामीं साधुसंतांची व खुद्द ईश्वराचीही त्याला मुभा आहे. “ देव जोडे तरी करावा अधर्म " ह्या तुकोबांच्या अभंगाचें सार तरी हेच आहे. प्रत्यक्ष शारीरिक व्यभिचार परमेश्वर केव्हांही करणे शक्यच नाहीं - किंबहुना 6 प्रथम