पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३९ ] तसा तो करील तर तो परमेश्वरच नव्हे; तर ' पौंड्रक वासुदेवा' सारखा ' तोतया परमेश्वर म्हणून बेशक समजावा पण आमचा भगवान् गोपालकृष्ण तसा नव्हता. तो खरोखरच ईश्वरावतार होता - स्वातंत्र्याची, प्रेमाची, सौंदर्याची, आकर्षकतेची ती चिन्मय मूर्ति होती हैं दांभिकांनी, नास्तिकांनीं, कुतर्कवाद्यांनीं व त्याच्या मायेनें भ्रमलेल्या जीवांनीं लक्षांत ठेवावें ! तो प्रभु प्रेमळ होता, सहृदय होता व त्याला कामविकारानें कां होईना पण गोपींच्या मनाची व देहाची होणारी तळमळ पूर्ण ठाऊक होती. पण एकाच स्पर्शाबरोबर एखाद्या जादूच्या कांडीप्रमा त्यांनी ती सर्व सृष्टि बदलून टाकली. मानसिक ध्यानाच्या बाबतींत " पाहे पां वा- लभाचेनि व्याजें । तया वज्रांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरूप "" - "6 नव्हतीं ? ' व " तैसा गोपिकांसि कामें " इ. ओव्यांतून ज्ञानोबासारखे संत तीच गोष्ट सांगतात. परमेश्वराचें खरें स्वरूप न कळलें- त्याची खरी ओळख न झाली तरी देखील सोयरा, मुलगा, मित्र, नवरा, शत्रु वाटेल त्या नात्यानें जरी त्या प्रेममयाचा उत्कट ध्यास घेतला-परमेश्वराचा प्रत्यक्ष द्रोह व शत्रुत्व केलें तरी सुद्धां तें तो ' उद- रांचा राणा' विरोधी प्रेमच मानतो तरी शेवटीं मोक्षप्राप्ति ही ठेवलेलीच आहे. अजामिळासारखा पापी पण पुत्रभावें स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें " हैं आपणास ठाऊकच आहे. यासाठीच " तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो " असें ज्ञानोचा म्हणतात ते लक्षांत ठेवण्यासारखें आहे. गटाराचें जरी पाणी असले तरी गंगेंत जाऊन पडल्या- वर मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप. " बाभळीचें लांकूड व चंदनाचें लांकूड हा भेद कोठवर ? जोंवर तीं लांकडें अग्नीच्या बाहेर आहेत तोंवर - " जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं " - पण मग दोहींचा अभि एकच ! मुख्य प्रश्न जो आहे तो स्वतःचीं ‘‘ निर्जे " म्हणजे अंतःकरणें- प्रभूच्या ठायीं रंगण्याचा, उत्कट प्रेमाचा आहे ! व गोपिकांचें प्रेम श्रीकृष्णावर किती उत्कट होतें याचा विचार आम्ही लवकरच करणार आहोत. पण तत्पूर्वी प्रत्यक्ष व्यभिचाराचें आचरण, दैहिक- शारीरिक व्यभिचाराची क्रिया, प्रत्यक्ष संभोगव्यभिचार कृष्णाच्या हातून झाला काय याचा अजून थोडासा विचार करूं या. 86. ८८ दैहिक व्यभिचार श्रीकृष्णानीं त्यांच्याशीं केला हे म्हणणें केवळ चूक आहे. कारण सर्व जगाला आपल्या वर्तनाचा धडा घालून देण्यास अवतरलेले देव व " ममवर्त्मानु- वर्तेते मनुष्याः पार्थ सर्वश: " असे सांगणारे भगवान् स्वतःच व्यभिचार करतील ही