पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४० ] 66 66 गौष्ट युक्तिज़ुक्तीस जुळत नाहीं. " मुखीं राम त्या काम बाधूं शकेना " इतका केवळ ज्याच्या नांवाचा प्रताप तो परमात्मान खुद्द त्या गोपींसन्निध असतो त्यांस काम- व्यथा व्हावी हें विपरीत दिसतें. यासाठींच “ म्यां गोपिकांसी काम केला । की त्यांचा सकळ काम हरिला " असें नाथ विचारतात. " एथ कामाचें न चले बाण दृढ वोरण स्मरणाचें " असें रासक्रीडावर्णनप्रसंगी नाथ म्हणतात, त्यावरूनही दैहिक पशुवृत्तीच्या कामाचें उत्थापन व शमन हैं येथें दिसत नाहीं. निदान तें श्रीकृष्णाच्या बाजूनें तर शक्यच नव्हतें. कारण "नानत्राप्त मवाप्तव्यं ” अशा प्रकारचा तो आप्तकाम प्रभू. मानवी गुणधर्मानीं तो वेष्टित झाला, मायेचा पगडा त्यावर बसला, त्रिगुणांच्या झोल्यावर तो झोके खाऊं लागला, तर मग तो प्रभु कशाचा ? गोपि कांच्या मनांत जरी तसल्या पशुवृत्तीचा उदय झाला असें घटकाभर धरले तरी त्यांची शांति त्याला अन्य त-हेने करता येत नव्हती काय ? प्रभुस्वरूप झालेले राम- कृष्ण परमहंस विवेकानंदाच्या डोक्यावर नुसता हात ठेवतात तर त्याची दृष्टि फिर वून टाकतात- त्यास सर्वत्र ईश्वर दिसूं लागतो; मग इथें तर खुद्द परमात्मा होता. त्यास अन्य कोणच्याच उपायानें त्यांच्या कामाचें शमन करतां येणें शक्य नव्हतें काय ? अर्थात् तें पूर्ण शक्य होतें व अशाच एखाद्या उपायाचा अबलंब करून प्रभूंनी 'त्यांचा सकल काम हरिला " ही गोष्ट निःसंशय आहे. “गोपी चुंबिति, हुंगिति, आलिंगिति सुंदरा शरीरास " एवढयाच वर्णनानें हुरळून जाऊन त्या मंगलमय प्रभु- वर व्यभिचाराचा अत्यंत निंद्य असा मिथ्यारोप करणारांनीं तत्पूर्वी " अस्खलित वर्य भगवान् गोपींचा कामताप तो शमवी " ही ओळ जरूर लक्षांत घ्यावयास नको काय ? प्रियवाचक ! आपले काव्यमय चक्षू--अध्यात्माच्या उच्च, मंगल, पवित्र वातावरणांत नेऊन सोडणारे दिव्य चक्षु- क्षणैक उघडा व याच " कामहरणा चा आम्ही केलेला खालील काव्यमय उलगडा असाच बहारीचा आहे तो सावधान चित्तानें “ सर्वेद्रियांस कान करून 66 - " ऐका:- चाल ( चंद्रकांत राजाची कन्या० ›› गोकुळांत देखनी मनोहर रम्य कृष्ण मूर्ती । ध्यान लागले ध्यास घेतला राधेच्या चित्तीं ॥ क्षणांत मोठा क्षणांत बालक होतो पाहोनी । मधुर अशा अव्याज तयाच्या कामचेष्टितांनीं ॥