पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४१ ] मोहक मुरली जगत्त्रयाला वेड लावणारी । विद्ध करी राधेच्या चित्ता काम-शरा मारी ॥ सुनील तनुची देखनि उज्ज्वल दिव्य अंगकांती । पंचबाणव्याकूळ होउनी मानितसे खेती ॥ मत्स्याकृति कुंडलें झळकती देखुनिया कर्णी । वैजयंति तळपते हरीच्या कंठिं हेमवर्णी ॥ हेवा वाटे वैजयंतिचा राधेच्या चित्तीं । मनीं म्हणे " ह्या भाग्याची मज होइल कां प्राप्ती ? ॥ वैजयंति मालिके, सदा कां तूंच गळां पडशी ? । भाग्यवंत तूं खरी एकली जगत्त्रयीं असशी ! ॥ अभागिनीला मला कधिं असा येइल कां समय ? । वैजयंति सांग गे ! होतसें उत्कंठित हृदय ! (1

मधुर मुरलिचा रख ऐकुनिया इतुक्यांतचि आली-- । जागृतीस तंद्रींतुनि राधा, मग्न पुन्हा झाली ॥ " मुरलि, सांग गे कुठून ऐसें भाग्य तुला लाहे ? | मुरलि नाहिं कां मति मम कृष्णीं १ का न मला तें ये ? ॥ पार न मुरली ! जगीं खरोखर तुझिया सौख्यालय । सांग तुझ्यासम कधीं योग्यता ये मम अधरांला ? ॥ हेवा वाटे देखुनि वैभव तुझिया भाग्याचें । सांग तुझ्यासम कधिं घेतिल मम चुंबन अधरांचें ? मिळवूनि ओठां मधुर ओष्ठ ते अपुले वनमाळी । पंचप्राणांतुनी काढिती सुस्वर कधिं काळीं ? ॥ सांग मुरलि, मम असेल कांगे ! भाग्य असे सखये ! | बोल किंगे ! कां बोलत नाहिंसि हृदय भरुनि कां ये ? " मुरलि बोलली " ऐक राधिके ! प्रेमानें अळवी - । वल्लभासि मम; तेणें येउनि सकल काम पुरवी !!. 66