पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४६ ] 66 16 "" 56 "" प्रभूच्या पायांवर लोळण घेतली तेव्हां कुठे देवांनीं त्याला तो दिव्य आनंद चाख- विला. अशा तऱ्हेच्या वर्णनाचा कांहींच अर्थ नाहीं काय ? टीकाकार, असें असूनही आपला अजून तोच आक्षेप असेल तर हा केवळ आपला आग्रहोचि उरे ” असे म्हणणें भाग आहे. विषयसुखांतच जर मौज असती तर त्या विषय- सुखांत डुंबणारें सर्व जग शाश्वत व अव्यंग सुखासाठीं अर्से तळमळत कां राहतें ? जगांतील सर्व सुखाच्या राशीवर बसलेल्या मानवाचीही कोणच्या सुखासाठीं तळमळ चाललेली असते बरें ? तेंच तेंच सुख-तेंच अतींद्रिय, अज्ञात, शाश्वत, दिव्य मंगल पवित्र व ' पद्मादुर्लभ ' सुख ह्या प्रभूच्या दिव्य प्रेमांत विलसत होतें ! पण वैषयिक पशुवृत्तीस-- दुरासद कामरूप शत्रूस ठार मारणाऱ्या श्री- कृष्णांनीं गोपींना दुसऱ्याच प्रकारचें वेड लावले होते. आपल्या दिव्य रूपाच्या व अद्वितीय मुरलीच्या छंदाने त्यांनी गोपींसच काय पण गोकुळांतील सर्व चराचर- सृष्टीस वेर्डे करून सोडलें होतें. नदीजलावरील तरंगभंगांतून व वायनें डोलणा-या वृक्षपल्लवांतून कृष्ण कृष्ण जय हाच ध्वनि उमटत असलेला पुढे उद्धवास ऐकूं आला, याचें कारण हेच श्रीकृष्णाचें अजब इंद्रजाल होय. श्रीकृष्णाच्या श्याम- सुंदर मूर्तांकडे व अद्वितीय तेजानें झळकणाऱ्या मुखारविंदाकडे पाहतां पाहतां गोपी इतक्या तन्मय होत की त्यांना देहभानही रहात नसे. " ब्रह्मानंदी लागली टाळी | कोण देहाते सांभाळी” अशी त्यांची अक्षरशः स्थिति होत असे. सायंकाली श्रीकृष्णाच्या सुंदर वदनाकडे पाहण्याचा दिव्य आनंद लुटण्यासाठी म्हणून मुद्दाम यशोदेच्या लामणदिव्यावर आपला दिवा लावण्यास आलेली एक गोपी त्या प्रभूच्या ध्यानांत इतकी रंगली कीं, इकडे तिचीं बोटे त्या दिव्यावर जळूं लागली तरी तिला त्याचा पत्ता नाहीं अशी रामतीर्थांनी एक गोष्ट सांगितली आहे, त्यावरून हीच गोष्ट सिद्ध होते. श्रीकृष्णाकडे निघालेल्या ऋषिपत्न्यांना त्यांचे पती थांबवून -- अडवून धरूं लागले त्या वेळेस " ह्या देहाचे आपण पती आहांत, ह्या देहावर आपलें स्वामित्व आहे तर हा घ्या आपला देह " असें म्हणून देहत्याग करून कृष्णाकडे निघालेल्या ऋषिपत्न्यांची गोष्ट हेच दाखविते. ( आणि खरोखरच खऱ्या अर्थानें सर्वाचाच प्राणनाथ " तो एक परमेश्वरच नाहीं काय ? तेव्हां अशा त्या खऱ्या प्राणनाथाकडे त्या ऋषिपत्न्या निघाल्या हे साहजिकच आहे ). वल्लभाच्या नात्यानें म्हणा पाहिजे तर-पण गोपींना श्रीकृष्णाचें ध्यान, श्रीकृष्णाचें मनन, व श्रीकृष्णाचेच चिंतन सदैव असे. “ मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळीयांच्या " " --