पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४९ ] कबीरजींचा विनय व तुम्ही कसची स्तुति करता ? यमुनातीरीं असणान्या वृंदावनांतील गोकुळच्या ब्रजोगनांच्या प्रेमाच्या पासंगासही मी पुरणार नाहीं ! कदाचित् त्यांच्या भाषेतील असणारी अतिशयोक्ति हीं जरी सोडून दिलीं तरी त्यावरून गोपींच्या प्रेमाचा अधिकार केवढा दांडगा होता, त्या प्रेमाचें स्वरूप किती उज्ज्वल व उत्कट होते याचा चांगलाच उलगडा होतो. ' 66 अशा तऱ्हेच्या उत्कट प्रेमाच्या मूर्ती गोपी होत्या. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणें " जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रूप । जयांचे मन संकल्प | . माझाचि वाहे " अशी त्यांची स्थिति होती. गोपिकांनी आपलें “" चित्त मनोबुद्धी- सहित " परमेश्वरास अर्पण केलें होतें. व प्रत्येक ' निमिषा ' ला कृष्णकन्हय्याच्या ध्यानाच्या वाढत्या आनंदाबरोबर तेतुलें अरोचक विषयीं घेइल " अशी त्यांची स्थिति झाली होती. विषयबुद्धि मनांत धरून ईश्वराचें चिंतन करावयास आलेल्या गोपी विषय - विरक्त झाल्या होत्या ! व म्हणूनच क्षणोक्षणीं परमेश्वराचें " सुख देखिलेल्या ” गोपींना " सन्निध स्वपती असतांही " त्या विषयसुखांत गोडी वाटेना ! त्याहून उच्च प्रतीचें सौख्य त्यांच्या हाती आल्यामुळें- त्या सुखाची गोडी त्यांनीं चाखिल्यामुळे त्यांना विषयानंदांत सौख्य वाटूं नये हे साहजीकच - ओघानेंच आलें. कारण " जेणे कदा चाखिलि न सुधा तोचि नर दुधा दह्यातें सेवी; " इतर नाहीं. त्या उच्च सुखाची कल्पनाही नसणाऱ्या मानवानीं विषयांतच मिटक्या माराव्यात हे साहूजीक आहे. किंबहुना फुलेवालीच्या पार्टीतील फुलांच्या सुगंधाच्या दर्पानें चिडून जाऊन आपल्या उशाशीं मासोळ्यांच्या पाट्या घेऊन त्या सुगंधा ( ! ) च्या आस्वादांत आनंदानें झोंपी जाणा-या मासेविक्या बायांप्रमाणे त्या दिव्य आनंदाचा तो कोर्डे दृष्टीस पडल्यास - आम्ही तिरस्कार करावा हेहि साहजीकच आहे. दोघां- चीही कींव करावी तितकी थोडीच: किंबहुना त्या मासेविक्या बाईस -- तिच्या अर- सिकपणास-हंसणाऱ्या आम्हांस आम्ही स्वतां तिच्याही वर ताण करीत आहों है दिसत नाहीं हें केवढें आश्चर्य ! परंतु 'रमेश्वराच्या ध्यानांत, परमेश्वराच्या चिंतनांत, परमेश्वराच्या अखंड भजनांत, परमेश्वराच्या संगतींत किती सौख्य आहे-- किती मौज आहे, केवढा आनंद भरला आहे याची कल्पना हवी असेल तर मुक्ति लाथ मारून मी भक्त तूं देव ऐसें करी " म्हणून ईश्वराचें भजन करण्यांसाठी सर्व साधुसंतांची केवढी तळमळ होती, झणे मुक्तिपद देशी तूं अनंता. आम्हांला 65 66 तुझी सायुज्यमुक्ति नको; तर तुझ्या कीर्तनाचा आनद भागूं दे; कारण त्यात जो