पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५८ ] आहा गोकुळीचा प्राण नेतोसी । निर्दय होसी तूं साच " ह्याप्रमाणें गोपीच्या शोकक्षोभाचो हृद्द झाली आहे. नामदेव त्याच प्रसंगाचे वर्णन करतातः - " गौळ- णींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हातीं ॥... आम्हां सोडोनीयां तूं रे कैसा जासी | तुजवीण पिशी आम्ही सर्व ॥ कोणी रथापुढे जावोनि पडती । आक्रोशें रडती सकळीक ॥ अक्रूर नव्हे बाई मोठा असे क्रूर...... अक्रूरा आम्ही सर्व पसरितों पदर । नेऊं नको श्रीधर मथुरेसी. "" । नाथ त्याच स्थितीचें अत्यंत करुण वर्णन खालील प्रमाणे करतातः-- ते त्यांची व्यथा सांगतां । मन अद्यापि धीर ( न ) धरवे चित्तां । ऐसें देवो सांगत सांगतां । कंठीं बापता दाटली ॥ मज मथुरे जातां देखोनी । आसुवांचा पूर नयनीं | हृदय फुटे मजलागुनी | प्रेमें लोळणी घातली || पोटांतील परमप्रीति । सारितां मागें न सरतो । धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागीं ॥ 'लाज विसरल्या सर्वथा | सासुरा पिता पति देखतां । माझे चरणीं ठेवूनि माथा | रडती दर्घिता आक्रंदे ॥ मजवणि अवघे देखती वोस | माझी पुनः पुन्हा पाहती वास । थोर घालोनिया श्वास । उकसाचुऋशी स्फुंदती ॥ ...... उभ्या ठाकोनि सन्मुख । माझे पाहती श्रीमुख | आठवें वियोगाचें दुःख । तेणें अधोमुख विलपती ॥ ...... ११ वरील हृदयस्पर्शी वर्णनें वाचून ज्याचें मन हेलावणार नाहीं असा इतभागी अह- दय प्राणी कोणी असेल काय ? श्रीकृष्ण मोठ्या प्रेमानें, उल्हासानें, सद्गदित कंठाने च ' वाष्पवृत्तिकलुष' अशा नयनानें गोपिकांचा उल्हास व त्यांची अनन्यभक्ति वणून मग वरील वियोगदुःख सांगत आहेत असा हा प्रसंग आहे ! " अहाहा ! " श्रीकृष्ण उद्भवास म्हणतात उद्धवा! तुला त्यांचें प्रेम काय सांगूरे. माझ्या प्रेमानें वेड्या झालेल्या माझ्या रूपानें भुललेल्या व माझ्या बांसरीच्या संगांतांत गुंगलेल्या अखिल गोकुळाचें व त्याच्या वियोगकालीन दुःखाचें मी कुठवर वर्णन करूं ? तिन्ही त्रिकाळ माझें दर्शन घडत असल्यामुळे त्या गोपांच्या आनंदाला पारावारच नव्हता. त्याचप्रमाणें उद्धवा ! माझ्या वेणुनादानें गाई तन्मय होऊन उभ्या रहात, वांसरें स्तन. पान विसरत, वाघ आणि हरीण त्याच मुरलीच्या संगीतांत गुंगून एकमेकांच्या खांद्यावर मान टाकून बसत तो देखावा किती अपूर्व दिसे म्हणून सांगू ? आणि त्यांत भर घालभ्यासाठी तितक्यांत गोपीहि त्या मुरलीच्या छंदावर नाचत येऊन माझ्या भोंवती उभ्या रहात असत ! " हे दिव्य प्रेम, ही तल्लीनता, हा संगतोन्माद आम्हां इतभागी प्राण्यांस कधीं मिळेल काय ? एक एक गोपीसे प्रेममे वहगय कोट 66 ,