पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६२ ] बहारीचा प्रसंग - तें सुंदर वर्णन आपण नामदेवांच्याच तोंडून ऐकूं:-" मदोमन्त हस्ती देखोनिया हांसे । पितांबर कांसे खोवियेला ॥ सावरोनि हाते कैसा देत गांठ । खोवीतसे नीट वैजयंति | खांबा टेकोनिया राहे पुढे उभा | सांवळी ही प्रभा अंगकांती किती है सुंदर ध्यान ! पण त्या दुष्ट कंसाला त्याचें कांहीं आहे का ? " " दुष्ट पापी हत्ती घाली अंगावरी | क्षणार्धेचि मारी गजालागीं ॥ उपडोनिया । 66 दांत घेतसे श्रीधर । जाइला उद्धार कुवलयाचा ॥ ” याप्रमाणे दाराशीच अंगावर घातलेल्या हत्तीला मुक्ति देऊन नामा म्हणे पुढे चालिला गोविंद | सावध सावध परीक्षिती " आतां यापुढील झगडा पाहण्यास परीक्षितीप्रमाणेंच वाचकांनाही सावध व्हावें असे आम्ही त्यांस विनवितों. ," कंसाने कृष्णहननाच्या इच्छेनें त्या भव्य व शोभिवंत मंडपांत शेवटची तयारी तर खूप जोरांत केलेली होती. मध्यभागी असणा-या कुस्तीच्या आखाडयांत नियुद्धा- मध्यें - प्राणघातक कुस्तीत - कृष्णास ठार मारण्यासाठी मोठमोठे मी मी म्हणणारे व त्याच्या पापी अन्नावर पोसलेले बोकडासारखे चाणूर मुष्टिक तोशल इत्य'दि मल्ल त्यानें गोळा केले होते. त्या धनुर्यागाच्या सभामंडपांतील आखाड्यानजीक हत्तीसारखे झुलत बैठका मारणान्या त्या पेहेलवानांनी जेव्हां आमची श्रीकृष्णबळ- रामांची -त्या लहानग्या पोरांची -दुक्कल पाहिली तेव्हां तर त्यांना हर्षवायूच व्हायची वेळ आली. " ह्या पोरांना आपण तेव्हांच चिरडून टाकूं " ह्या भावनेनें फुगलेले ते मल आनंदाने नाचूं लागण्यापर्यंत वेळ आली. श्रीकृष्णाला पाहून तर त्यांतल्यात्यांत त्यांच्या फारच बडबडी सुरू झाल्या. कृष्णार्ते देखोनी वल्गना करिती । चोळिताति माती दंडालागीं " अशी त्यांची मारे दंगल उडाली. पण बिचा-यांना काय ठाऊक की पुष्कळदां दिसतें तसें नसतें. त्या दोन चिमकुल्या देहांत केवढ्या प्रचंड शक्ती वास करीत आहेत याची बिचाऱ्यांना काय कल्पना ? ज्या शेषानें नुसते मस्तक हलविल्या- बरोबर त्याच्या मस्तकावरील पृथ्वी थरथर कांपूं लागते व धरणीकंप होतात त्याच शेषाचा अवतार आज बळरामरूपाने आपणांसमोर उभा आहे व अखिल ब्रह्मांडाचें चक्र जो सइज लीलेनें खेळवितो तो साक्षात् शेषशायी भगवान् कृष्णरूपानें आपणांशीं आज लढाईला आला आहे हे त्या पामरांना कसें कळावें? कंसाने ताबडतोब चाणु स कृष्णाबरोबर व मुष्टिकास बलरामाबरोबर त्या प्रशस्त आखाड्यांत भिडण्याची व झुंजण्याची—आणि झुंजतां झुंजतां पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे ठार मारण्याची आज्ञा केली. अरेरे! खुळा बिचारा कंस | नामदेव त्याच्या खुळेपणाचे वर्णन करतात:-