पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६४ ] काराचें वर्णन नामदेव करतात " देव वर्षताती सुमनांचे भार । भक्त जयजयकार गंर्जताती ॥ ...... नामा म्हणे पुढे अप्सरा नाचती । वर्णिताती कीर्ति कृष्णजीची ! " केवढा तो रम्य प्रसंग ! " विनाशाय च दुष्कृतां " अवतरलेल्या प्रभूचे असे अभिनंदन व्हावे हें साहजीकच आहे. अशा रितीनें मोठ्या आपतीतून व संकटांतून- कंसाच्या घोर जाचांतून व त्रासांतून सुटल्यामुळे सर्व जगाला हायसें झालें - आनंद वाटला ! कंसाचा बाप-उग्रसेन-बंदीत होता त्यास मुक्त करून प्रभून त्यास पुन्हां मथुरेच्या सिंहासनावर बसविले व सर्व राज्याचा बंदोबस्त लावून दिला. कंसहननार्थ प्रभू मथुरेस आल्यावर मार्गे नंदयशोदा व गोकुळांतील कांहीं उत्कट कृष्णप्रेमी स्त्रीपुरुष यांना गोकुळांत करमणे शक्यच नव्हते; म्हणून ताही मथुरेस यावयास निघालीं व बरोबर कंसवधाच्या वेळेस मथुरेस येऊन पोंचली. वंसुदेवदेवकी बंदींतून मागेंच मुक्त होऊन त्याच वाड्यांत रहात होतीं. कृष्णांनी आपल्या जन्मदात्या मातापित्यांच्या पायांवर मस्तक ठेवलें व अठरा- वर्षांनी पुन्हां झालेल्या दर्शनाच्या दिव्य आनंदाच्या आलिंगनाचें वात्सल्य सुख • आपल्या मानेस व पित्यास दिलें. ज्या वाड्यांत आपला जन्म झाला 6 तो वाडा , सगळंकडे हिंडून पाहिल्याशिवायही प्रभूस रहावेना ! याप्रमाणे सर्वांच्या भेटी व आनंद होऊन चार दिवस झाल्यावर नंदयशोदा व वसुदेवदेवकी यांनी कृष्णबलरामांच्या मौंजिबंधनाचा विचार करून गर्गमुनीस-त्यांच्या कुलोपाध्यायास ( यांनींच कृष्णाचें जातक वर्तविलें होतें ) - बोलावून व चांगलासा मुहूर्त पाहून मौजिबंधन विधि थाटानें पार पाडला व नंतर सांदीपनी गुरूकडे उज्जनीस कृष्णबलराम विद्या शिक- ण्यास राहिले. त्यांच्या बरोबर सुदामाही होता. लहानपणच्या मैत्रीचा निर्भेळ आनंद तो ! त्याचें कोठवर वर्णन करावें ? त्या आनंदाच्या भरात त्यांच्या अखंड मैत्रीच्या कित्येकदा आणाभाका झाल्या व त्या आमच्या कृष्ण प्रभूनें पाळल्याही. त्याची हकीकत पुढे येईलच. त्या आधों आपण त्यांच्या अध्ययनांतच सभ्यां रंगूं. सांदीपनीसारखे गुरु व कृष्णबलिरामासारखे कुशाग्रबुद्धीचे विद्यार्थी ! मग विद्या सपाट्यानें वहाँ हो म्हणतां पुरी व्हावी यांत कांहींच नवल नाहीं. किंबहुना "चौसष्ट दिवसांत सर्व वेद व नंतर संग्रहसहित धनुर्वेद पठण करणाऱ्या त्या मुलांची-राम- कृष्णांची कुशाग्र बुद्धि पाहून सांदीपनीस त्यांच्या प्रभुत्वाची खूण पटली व सर्व विद्या मोठ्या आदरानें त्यांनी त्यांना दिला. सांदीपनीचा आपल्या शिष्यास हाच बोध होता कीं, होतां होई तों "कर्मी वसा, नसो परमर्मी लोचन, असा दया धर्मी । ""