पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६५ ] नमहि मृषोक्कि न यो, शर्मी नांदा, शिरा क्षमावर्मी ॥ " गुरुचें आपल्या शिष्यांवर पुत्रापेक्षांहि अधिक प्रेम होतें. कृष्णबळरामांच्या पूर्णावताराची गुरुजीस जाणीव होती. असो. याप्रमाणे अवघ्या सहा महिन्यांत अध्ययन पुरे झालें व गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली. सांदीपनीसारखा निस्पृह योगी काय मागणार ? पण कृष्णाचा फारच आमह पाहून त्याच्या भार्येनें आपला मृतपुत्र आपणास परत मिळावा असें मागितले. ताब डतोब कृष्णांनीं यमलोकीं जाऊन त्यास परत आणला. त्याचे वर्णन ज्ञानेश्वर मुखानें प्रभू आपण होऊनच अर्जुनास सांगतात " मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवांचि पवाडा देखिला ! " असो. याप्रमाणें गुरुगृहीं अध्ययन संपवून रामकृष्णांच्या स्वान्या परत मथुरेस आल्या तेव्हां त्यांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या त्यांच्या मातापित्यांनीं व सर्व पौरजनांनीं गुढ्या तोरणें उभारून त्यांचें मोटे थाटांत स्वागत केलें. - याप्रमाणे काही काळ स्वस्थतेत जातो न जातो तोंच रामकृष्णांच्या धनुर्विद्येची परीक्षा होण्याची ती विद्या कसोटीस लागण्याची वेळ लवकरच येऊन ठेपली. कारण कंस हा त्यावेळों सर्व भरतखंडांत सम्राटपद पावलेल्या दुष्ट जरासंधाचा जांवई होता. यानेंच शंभर राजे बंदींत घालून त्यांचा 'नरमेध' करण्याचा दुष्ट विचार केला होता व शेवटीं ह्यास श्रीकृष्णांनी युक्तीनें भीमाकडून कसा पुढे ठार केला-जरेनें नसा सांधला तशाच त्याच्या चिरफळ्या कशा उडवल्या हे आपण महाभारतांत पाहिलेच आहे. तेव्हां अशा ह्या प्रबलप्रतापी पग तितक्याच दुष्ट सम्राटाच्या -- मगधाधिपती जरासंधाच्या दोन मुलीं कंसास दिलेल्या होत्या. त्यांनी त्या कंस स्त्रियांनी आपल्या लाजिरवाण्या जिण्याची कहाणी आपल्या बापाजवळ सांगून आपल्या दुःखी निश्वासाच्या वान्याने त्याचा कोपानल भडकविला, त्यांत आपल्या अश्रूंचें घृत घातलें व त्यास मथुरेवर धाडून दिले. पोरींच्या विलापानें खवळलेला दुरात्मा जरासंध ज्यांनी त्यांचें ' कपाळ ' फोडले त्या कृष्णाचा सूड घेण्यासाठी म्हणून मिळाली तितकी सेना घेऊन मगधंदेशाहून तडक निघाला व सपाट्यासरशी त्यानें मथुरेस वेढा घालून नाकेबंदी केली. मथुरेंतील शूर यादव- वीरांनीही शस्त्रास्त्रांच्या जोरावर सत्तार्वास दिवस मथुरा लढवली. तरीसुद्धा वेढा उठण्याचें चिन्ह दिसेना. तेव्हां अठ्ठाविसाव्या दिवशीं बळराम व कृष्ण हे अनुक्रमें दक्षिण व पश्चिम द्वाराने बाहेर पडून त्यांनीं भयंकर पराक्रम करून शत्रूचें सैन्य उधळून लावलें व ते विजयी वीर परत आले. दुसऱ्याच दिवशीं वेढा उठवून जरासंध परत गेला व सर्वांनी आमच्या दिव्य पराक्रमी वीरांचें- रामकृष्णांचे अभिनंदन केलें ! ५