पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६७ ] द्वीवर दिनकर आल्यावर लाखों नक्षत्रांचा जसा लोप होतो तशी स्थिति झाली. नांग राने ओढून मुसळाने टाळकें सडकणाऱ्या व सुदर्शनचक्रानें कित्येकांची मुंडकी एकाच सपाट्यांत उडवणाऱ्या त्या वीरद्वयापुढे कोणचा योद्धा किंवा कोणचें सैन्य टिकेल ? ज्याप्रमाणें “चतुर्दशसहस्राणि रक्षसां भीमकर्मणां । हतान्येकेन रामेण मानुषेण पदातिना " असें रामप्रभूचें मार्मिक शौर्यवर्णन रामायणांत आहे त्याचप्रमाणे इथेंही स्थिति झाली. असो. याप्रमाणे त्यांची दाणादाण उडवून वाटंत करवीरचा दुष्ट 'कोल्हा' - शृगालराजा अंगावर आपण होऊन चालून आला तेव्हां त्याचा सुदर्शन चक्रानें समाचार घेऊन त्यास ठार मारून आमचे प्रभु भगवान् आपल्या वडील भावासह मोठ्या थाटानें मथुरेस परत आले. मल्लविद्येप्रमाणेंच धनुर्विद्येतही अलौकिक लौकिक मिळविलेल्या त्या वीरांचें स्वागत मथुरेत केवढ्या उत्साहाने व आनंदाने झाले असेल याची वाचकांनीच कल्पना करावी ! 1 यानंतर कृष्णप्रभूचीं दोन तीन वर्षे मथुरेस सुखांत गेलीं. सर्व आप्तेष्टांची ओळख याच वेळीं त्यांनीं करून घेतली. पंडूच्या मरणानें हिमालयांतून हस्तिना- पुरास भीष्मांच्या आश्रयास आपल्या पोरक्या पोरांना धर्मादि अर्भक पांढवांना घेऊन येऊन राहिलेली कुंती आपली आत्या आहे- वसुदेवाची बहीण आहे हे कळ- ल्यावर त्यांच्या समाचारास व वृतराष्ट्रादिकांस त्यांच्या योग्य परिपालनाचा उपदेश करण्यास प्रभूर्ती अक्रुराची रवानगी केली. त्यानंतर लवकरच कुंडिनपुरास भीष्मकानें आपल्या पोरीचा-रुक्मिणीचा स्वयंवर मांडला आहे व जरासंध, दंतवक, शिशुपाल क्रथकौशिक इत्यादि राजे तेथें जमले आहेत असे त्यांस कळल्यावर प्रभुही तेथें गेले. पण त्यांच्या पराक्रमाच्या धास्तीनीं हाय खाल्लेल्या त्या शेंदाडशिपायांनीं " तो राजा नाहीं " हीच सबब पुढे आणली ! ताबडतोब उदारमनस्क कथकैशिकानें आपलें राज्य कृष्णास अर्पण करून त्याच्या मस्तकावर आपला मुकुट ठेविला. खुद्द भीष्मका- नेही त्या राज्याभिषेकसमारंभास हजर राहून कृष्णाचा गौरव केला. पण जरासंधादि दुष्टांस हें कसें खपावें ? वास्तविक या वेळी खरे पाहतां स्वयंवरही व्हावा. पग आपल्या मनाजोगतें होत नाहीं व तसे करण्याची धमकही अंगांत नाहीं असे पाहिल्यावर सभाच उधळून लावण्याचा किंवा तातून निघून जाऊन ती बंद पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैदाडशिपायांप्रमाणे जरासंधादि वीर तावातावानें आपल्या देशास निघून गेले ! व याप्रमाणें हा स्वयंवर राहिला. L .