पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७३ ]

वर रुचणार? शेवटीं उद्धवाच्या विनंतीवरून व गोपींच्या दिव्य प्रेमासाठी भगवंतास त्या वाळवंटावर प्रगट व्हावें लागलें ! अस्तु.
 आतां आपण रुक्मिणीच्या रम्य विवाहकथेकडे वळूं. या कथेस रुक्मिणी स्वयंवर असेही म्हणता येईल. कारण कृष्ण प्रभूला रुक्मिणीनें स्वतः मनानें वरिले आहे. लौकिक दृष्टीचा स्वयंवर मात्र एकदां मांडला जाऊन कसा राहिला--मोडला हे आपण मागे वाचलेंच आहे. विदर्भ देशाचा भीष्मक राजा इतर शेकडो राजांप्रमाणेच जरासंधाचा मांडलिक होता व त्याच्याच निमंत्रणावरून त्याला मथुरेच्या वेढ्याचे वेळींसुद्धां जाऊन त्याच्या बाजूनें लढवें लागले आहे. त्याच्याच भीतीनें व आगृहानें तो दमघोषाच्या शिशुपालास आपली मुलगी देण्यास तयार झाला होता. वास्तविक लहानपणापासून पुराणश्रवणांतून ज्या सांवळ्या प्रभूची गुणवर्णनें भीमकबाळा - रुक्मिणी ऐकत होती त्यालाच तिच्या बालहृदयानें वरावें व उत्तरोत्तर तें प्रेम दृढ व्हावें हें साहजीकच आहे. खुद्द राजाचाहि विचार कृष्णप्रभूसच तिला द्यावी असाच होता व विद्वान् ब्राम्हणांनींहि पण त्याला तशीच सल्ला दिली. वैदर्भी चें- त्या सुंदर बालेचें-- प्रेम लहानपणापासूनच कृष्णावर होते हैं तीच " कौरवयादवभार्या एका जागीं मिळोनिया बसल्या " असतां सांगत आहे. " प्रथम म्हणे वैदर्भी, बाई! होते लहान मी कन्या | धन्या कृष्णकथा मज तेव्हांचि रुचे, न आवडे अन्या. पण तिच्या आधीं जन्मलेल्या आमच्या रुक्म्याला तिच्या दादाला - त्याचे काय ? आपल्या भगिनांच्या हृदयदानाचा किंवा पित्याच्या खऱ्या विचाराचा विचारहि न करता मन मानेल तसा धिंगाणा घालणारा तो दुष्ट राक्षस होता. शिशुपाल, वक्रदंत, जरासंध, कंस ह्यांसारख्या राक्षसांशीं त्याचें 'समानशीलव्यसना' मुळे' सख्य' होते. त्यांतील 'शिशुपाल हा मोठा पराक्रमी राजा आहे व त्यालाच तिला द्यायची, त्या गवळटाला कोण देतो ' असा त्याचा हट्ट होता व त्याप्रमाणे त्यानें शिशुपालास आपल्या सर्व मित्रांसह व परिवारासह लग्नास येण्यास - रुक्मिणीचा स्वीकार करण्यास- पाचारण केले होते.
 केवढा हा प्रसंग ! "बंधु विकार निज भगिनीला | शरण कुणा जावें ? " ही कै. अण्णासाहेबांची उक्ति किती खरी आहे! या वेळेस रुक्मिणीनें त्या रुक्म्याची किती विनवणी केली असेल, " भीमकबाळा म्हणे नृपाळा त्या शिशुपाळा मी न वरी " ह्याप्रमाणें आपल्या पित्याजवळ तिनें किती शोक केला असेल याची कल्पनाच केली पाहिजे ! परंतु सज्जन हृदयाचा पण कमकुवत मनाचा तिचा पिता जरी तिचें कल्याण इच्छित होता व कृष्णासच ती मिळावी अशी जरी त्याची इच्छा होती तरी