पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७४ ]

कंसाने आपल्या बापास बंदीत घालून ज्याप्रमाणे आपला दुष्टपणा चालूं ठेविला त्याचाच मित्र रुक्म्या होता हे वाचकांनी लक्षांत ठेविलें म्हणजे त्या कर्दनकाळ पुत्रापुढें प्रत्यक्ष बापाचीहि डाळ कशी शिजेना हे समजून येईल. अस्तु. गरीब बिचारी राणी- रुक्मिणीची माता-तिला कोण विचारतो ? जिथें राजाचेंहि कांही चालेना तिथें तिचा काय पाड ? याप्रमाणे सगळीकडूनच आकाश फाटल्यावर व नैराश्यानें बेरल्यावर त्या दीन रुक्मिणीनें कोणाकडे बरें धांव घेतली असेल ! अर्थात् त्या अनाथनाथ, भक्तवत्सल, प्रभु गोपालकृष्णावांचून दुसऱ्या कोणाकडे असणार ! तिनें दऊत-टाक घेतला व त्या प्रभूच्या चरणीं एक निर्वाणीची “ पत्रिका " धाडली. " स्वकरें वसंत-तिलका वृत्ते पत्रांत सात मोजोनी । लिहिलीं होतीं तींही लिहितां लिहितां क्षणांत योजोनी. ” भयभीत प्रेमाची ही केवढी तारांबळ | ती पाहून कोणाला बरे रुक्मिणीची कींव येणार नाहीं ! रुक्मिणीनें श्रीकृष्णास लिहिले होते - " ऐकोनिया भुवनसुंदर या गुणातें । निर्लज्ज चित्त हार हे तुजला वरीते देहार्पणा करुनि तूं पति म्यां वरीला " पुन्हःपुन्हां रुक्मिणी हीच गोष्ट सांगते कीं " म्यां तूज निश्चित- मने॑ वरिलें अनंता । येऊनिया करि धरोनि करी स्वकांता....येऊनिया करिं धरी मज़ चक्रपाणी । चैद्यादि दुष्ट हरि हे न धरूत पाणी " नंतर ती प्रभूला सुचवितेः “ लग्नाचिया पहिलिया दिवसांत यावें । संगीं समग्र बल यादव - सैन्य घ्यावें । या चैद्य-मागध- बळांबुधिते मथावें ! मातें निशाचर -विधी करुनी हरावें ॥" त्यावर " तुझे भाऊ जर आडवे आले तर त्यांना कापून काढल्याशिवाय मला तुला कसें नेतां येईल? ” अशी कृष्णाच्या तर्फे शंका घेऊन रुक्मिणी म्हणते " यांचे कुळीं हरि असे कुलदेवियात्रा । तेथूनि तूं मजसि ने.” शेवटीं " जन्मा शतांत मरणें स्मरणें मुकुंदा। अंतीं तुझ्याच वरणें चरणारविंदा " अशी प्रार्थना करून हरिचरणसरोजी रुक्मिणीची शिराणी " ठेऊन दिली व तें पत्र सुदेव नांवाच्या ब्राह्मणाबरोबर द्वारकेस कृष्णाकडे रवाना केलें. परंतु हाय ! अगदीं लग्नदिवसापर्यंत सुद्धां प्रभूची स्वारी आली नाही हे पाहून रुक्मिणीच्या हृदयाची किती घालमेल झाली असेल याची वाचकांनींच कल्पना करावी. त्या वेळच्या आपल्या स्थितीचें तीच वर्णन करीत आहे:- "चिंताज्वरांत रात्रौ माझा नाहीच लागला डोळा । जाण्यासाठी कंठीं शतवार प्राण जाहले गोळा ॥ "
 अहाहा ! इतकी तळमळ लागल्यावर रुक्मिणीसारख्या सर्वस्वार्पण करणाऱ्या प्रियबालेच्या भक्तीचा अंत त्या दयाघनास अधिक कसा पाहवल ? " तरी रंक एक नाडलेपणें । काकुळती धांव गा धांव ह्मणे । तरी तयाचेनि येणें । काय न घडे मज ? ॥