पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७६ ]

रितीनें मनोरंजक आहे. कारण यांतच ' भल्याभल्यांची अब्रू घेणाऱ्या ' स्यमंतक मण्याची कथा आहे. ही कथा म्हणजे प्रभूवर आलेला चोरीचा आळ होय. यादवांपैकीं सत्राजित नांवाच्या एका सरदाराचा भाऊ त्याचा स्यमंतक मणि गळ्यांत घालून मृगयेस गेला असतां एका सिंहाने त्यास फाडून खाल्लें. त्या सिंहापासून अस्वलांचा राजा जांबवान् यानें तो स्यमंतकमणी चोरून नेला. इकडे तो मणी कोणीं नेला याचा पत्ता लागेना तेव्हां त्या अविचारी सत्राजितानें, श्रीकृष्णानों तो त्याजवळ राजाच्या खजिन्यांत ठेवण्यासाठी म्हणून एकदां मागितला होता, याच केवळ सबबीवर संशय धरून कांहीएक विचार न करता त्या मण्याच्या चोरीचा आळ बेधडक श्रीकृष्णावर लादला ! तेव्हां प्रभूता साहजीकच राग येऊन तो आळ नाहींसा करण्यासाठी त्यांनी जांबवानाशीं २७ दिवस अहोरात्र युद्ध केले व त्यास जेर केला. " त्रिनवरात्र जो दांडगा भांडगा भांडला " अशा तऱ्हेचे त्या अस्वलांच्या राजाचें पंतानीं वर्णन केले आहे. असो. याप्रमाणें त्या राजाला जेर करून सत्राजिताचा हरवलेला मणी श्रीकृष्णांनीं त्याचा त्यास आणून दिला. तेव्हां आपण खोटाच आरोप केल्याबद्दल त्या राजाला पश्चात्ताप होऊन तो प्रभूस शरण गेला व त्यानें आपली मुलगी-सत्यभामा - कृष्णास अर्पण केली. जांबवानानेही आपली मुलगी - जांबवती - शूर व लढवय्या कृष्णाला अर्पण केली. श्रीकृष्णांनीं आपला सुधासीकर " हात तिच्या वरून फिरवून तिला " उजरिली " व मग तिचा स्वीकार केला. याप्रमाणें या स्यमंतक मण्याच्या आख्यानांत श्रीकृष्णास दोन भार्योची प्राप्ति झाली. पण तें आख्यान मात्र तेथेंच खलास झालें नाहीं. सत्यभामेची पूर्वीच मागणी घालणारा शतधन्वा ती श्रीकृष्णास मिळाली – “विश्ववैभवाची ती वैजयंती लक्ष्मीवल्लभासारख्या लोकैक वीराच्या गळ्यांत पडली " म्हणून चिडून गेला. " आपल्या भिकारी भाग्यदेवतेला दोष " देण्याचें टाकून त्या "भणंग भिकाया " ने याचा निर्दय सूड सत्राजितावर उगवला व लाक्षागृहांत दग्ध झालेल्या आपल्या आतेस व आतेभावांस- कुंतीस व पांडवांस याच वेळीं तिलांजली देण्यास श्रीकृष्ण हस्तिनापुरास गेले आहेत ही संधि साधून त्या शतधन्व्यानें सत्राजिताचा खून करून तो मणि पळवळा. शेवटीं त्यास काशीजवळ ठार मारून श्रीकृष्णास तो मणि मिळाला नाहींच. कारण तो अकुराजवळ-दानपति अक्रुराजवळ होता. परमार्थासाठीं कां होईना पण अक्रूरासारख्या भगवद्भाक्तास त्या रोज दोन भार सोनें देणाऱ्या मण्यानें लोभ उत्पन्न केला हे पाहून त्या ' शत्रू ' चें-लोभाचें क्षणैक आश्चर्य वाटतें. असो. याशिवाय श्रीकृष्णाच्या नमजिता, कालिंदी इत्यादि पांच