पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७८ ]

तुलसीदल टाकलें तो काय चमत्कार | प्रभूर्वे पारडें चद्दिशीं वर झालें | सत्यभामेचा गर्व परिहार झाला. " रुक्मिणीनें एक्या तुलसीदलानें गिरिवरप्रभु तुळिला " ही ओळ ह्याच प्रसंगास अनुसरून आहे हे सूज्ञ वाचकांनी जाणलेंच असेल. अस्तु.
 आतां आपण भक्त सुदाम्याच्या रम्य पण करुण कथेकडे वळू. सुदामदेव असें त्यास म्हणत असत. पण त्याचें खरें नांव सुदामा हा ब्राह्मण अतीशय दरिद्री. त्याच्या गरीबीचें वर्णन करणेंहि कठिण आहे. “ घरांत वाजे नकार घंटा । पोरें भुकेनें करिती तंटा ” इत्यादि बर्णनें वाचकांस ठाऊक असतलिच. खायला पोटभर अन्न नाहीं, त्यायला अंगभर धड वस्त्र नाहीं, अशा स्थितीत तें गरीब बापडे कुटुंब आपली संसारयात्रा कशी कंठीत असेल याची कल्पना तो दुर्धर प्रसंग ज्यावर असेल त्यासच येणार आहे. सांप्रतच्या हिंदवासीजनांपैकी पुष्कळांस मायबाप सरकारच्या कृपेनें याची योग्य कल्पना करतां येणें शक्य आहे. अरेरे! त्या सुदाम्याचे व त्याच्या कुटुंबाचे हाल डोळ्यांपुढे ऊभे राहिले, त्या कल्पनाचित्राकडे जरी क्षणमात्र पाहिलें तरी हृदय फाटून जाते! खायला पोटभर मिळत नसल्याने हातापायांच्या काड्या झाल्या आहेत, पोट खपाटी गेलें आहे; फाटक्या तुटक्या वस्त्रांनी सर्वोच्या देहाची लज्जा कशीबशी रक्षण होत आहे, "अन्न अन्न " करून मुले आईला सतावून सोडीत आहेत व मोठ्या कष्टानें भीक मागून किंवा मोलमजुरी करून आणलेल्या चार दाण्यांचा घास मुलांच्या तोंडांत घालतांना प्रेमळ मातेच्या डोळ्यांतून या खडतर दैवाबद्दल टप् टप् अश्रू पडत आहेत हा देखावा पाहून कोण या हृदयाचें पाणी होणार नाही ?
 पण इतकेंहि असून ते कुटुंच - विशेषतः सुदामा - त्यांतल्यात्यांत सुखानें व समाधानानें रहात होता. कारण तो आत्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ व स्थितप्रज्ञ होता. “ मात्रा-स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः । आगमापायिनो नित्यास्तान् तितिक्षस्व भारत " हा भगवंतांचा भावी उपदेश त्यास ठाऊक होता. निस्पृह व आत्मज्ञानी पुरुष अशा बाह्य विपत्तींचे डोंगर कोसळले तरी अचलच असतात. त्यांच्या हृदयांतील भगवंताच्या भजनाची बैठक कायमच असते. प्रारब्धाचे भोग भोगल्यावांचून गत्यंतर नाही हे त्यांस ठाऊक असतें. सुखप्राप्तीच्या वेळेस देवाचें नांव घेऊन दुःखाच्या राशी अंगावर आदळू लागल्या कीं, परमेश्वरास शिव्या देत सुटणारे ते तुम्हां आम्हां सारखे प्राकृत नसतात."न मिळो खावया न वाढो संतान । परिहा नारायण कृपा करो" हीच त्यांची अहर्निश तळतळ असते. इतकेंच नव्हे तर " दारिद्रयाच्या