पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८२ ]

ती तरी प्रभुचीच भार्या ! अर्थात् तितकीच भक्तवत्सल. तिनें लगेच “तों रुक्मिणि धरि कर धावोनी म्हणे मला ही रुचली ! " अहाहा ! ज्यांनीं नेहेमीं षड्स पक्कानांचें भोजन करावे त्या रुक्मिणी- पांडुरंगांनीं सुदाम्याच्या पोह्यांसाठी अशी प्रेमळ झोंबी खेळावी ही भक्तवत्सलतेची व भक्त प्रेमाची खरोखर हद्द झाली ! रुक्मिणीनें ती सर्व पुरचुंडीच उचलली व “ पोहे नेलें हिरोनि भगवत् --पर- पद्मजा सतीनें । प्राथुनि रिझवुनि हंसवुनि रमवुनि निज पतिला सुमतीनें !” तो देखावा पाहून सुदाम्याचें हृदय भक्तिभवानें किती भरून आले असेल व त्याच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंच्या धारा कशा वाहूं लागल्या असतील याची कल्पना त्याच्यासारख्या भक्तासव येणार आहे. “देवा!” सुदाम सद्गदित होऊन म्हणाला, " गरीबाचे पोहे आपण व रुक्मिणीमाउलीनें गोड करून घेतले हा आपला थोरपणा आहे !" त्याच्यानें जास्त बोलवेनाच.
 परमेश्वराच्या वरील भक्तवत्सल्याचें कोठवर वर्गन करावें ? देव भावाचा किती भुकेला असतो याची साक्ष वरील गोष्ट पटवीत आहे. " तुलसीदल पाणी । चिंतनाचा भुकेला ' असे तुकोबा म्हणतात तें खरें आहे. भिलिणीची प्रेमानें दिलेलीं बोरें ज्या प्रभूनी आनंदानें खली, विदुराच्या कण्या अलौकिक प्रेमानें व आवडीने ज्या प्रभू सेवन केल्या, द्रौपदीच्या भाजीच्या पानावर जो हरी संतोष पावला त्याच प्रभूने सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने भक्षण करावेत हे साहजीकच आहे. “ पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्युपडतं अश्रामि प्रयतात्मनः ” असे त्यांचे ब्रीदच आहे. प्रभूला खरी भक्ती हवी. दुर्योधनासारख्याच्य। दाटुनि " केलेल्या " आग्रहास ते ' डावलून ' जातात व विदुर-सुदाम्यासारख्या भक्तांच्या झोपडीकडे प्रभू आनंदानें धाव घेतात तें याचसाठीं ! सर्व पृथ्वीच्या वैभवाची जरी हवेली उठवली तरी भक्तीवांचून ती फोल आहे; त्यापेक्षां प्रभू “ साधुची झोपडी बरी रे " अर्से उद्धवास म्हणत आहेत त्याचें हेच कारण. शंकरासारख्या दिव्य तपस्व्यानें ज्याची 'पायवणी माथा वहावी, "अमर-पुरीसारख्या घरकुलांचा व इंद्रादिक बाहुल्यां' चा खेळ खेळगारी लक्ष्मी पाय घुवाचिया देवा " जिथें “पात्र " होते, वेदासारखे सर्वज्ञ जेथें 'नेति नेति' म्हणून मागे सरतात, व हजार जिव्हेचा शेषही ज्या प्रभूच्या " आंथरुणातळवंटी " दडतो त्या प्रभूपुढे “येर प्राकृर्ते हेंदरें केंवि जाणो लाहे ? ” त्या प्रभूला आपल्या चकवण्याचा यत्न करणे किती विफळ आहे बरें ? एक खरी भक्ति धरा, मग प्रभू दुसऱ्या कशाचीही चौकशी करत नाहीं. तुमचें जातगोत, कुलशील, विद्यावय,