पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८५ ]


ऐसें म्हणे सगद्गदकंठ । आलिंगुनि वंदुनि विप्राला परते मग वैकुंठ !” या ठिकाणी कोमलतेची, सहृदयतेची, करुणरसाची खरोखर हद्द झाली ! किंबहुना हे सर्वच आख्यान पंतांनी तसे रंगविले आहे. असो.
 कृष्णप्रेमाच्या तंद्रीत गुंगून अश्रु ढाळणारा सुदामा देवाचा वियोग झाल्याबरोबर खडबडून जागा झाला-- सावध झाला - तों प्रभूची ती सांवळी मूर्ति केव्हांच नाहींशी झाली होती. "अरे, पग मी देवाजवळ कांहीं मागायचें विसरलोंच की! आणि देवानींहि पण कांहीं दिलें नाहीं. पण मागायला माझें चित्त कुठे ठिकाणावर होते म्हणा! पण आता घरी गेल्यावर बायको हंसेल ना ? हासूंदे बापडी ! पण प्रभुराज वदान्य-श्रेष्ठ खरे. कारण मला जर द्रव्य दिलें तर मग त्या द्रव्याच्या धुंदीत मी ईश्वरास विसरलों असतो म्हणून त्या दयाळु देवानें मला वित्त दिले नाहीं. कारण त्याला माझें चित्त हवें आहे--तें सदैव त्याच्या चरणी रहावें अशी त्याची व माझी इच्छा आहे. तेव्हां त्यानीं केलें हैं ठीकच केलें." असें म्हणत स्वारी जों आपल्या गांवीं येते तोच 'तो त्याच्या दृष्टीला पडला सहसा तेजोराशी. " सुदाम्याची नगरी अपर द्वारका झाली होती !-सुवर्ण नगरी बनली होती! पोह्याच्या एका मुठीच्या मोबदला सोन्याची नगरी भक्ताला अर्पण करण्याची वत्सलता देवावांचून इतरत्र दृष्टीस पडेल काय ? सुदाम्यासारख्या भक्ताला संसाराचे क्लेश पडल्यावर मग 'भक्तांचा सोस ' हवा कशाला ? अनन्यचित्तानें ज्यांनीं प्रभूला सर्वस्व वाहिले त्यांची काळजी जर भगवंतांनीं केली नाहीं तर तो भगवंत कशाचा ? " तैसा मी वाचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं " अशी ज्यांची स्थिति झाली, किंबहुना ज्यांनी “ मजाचि नाम पाही । जिणिया ठेविले ” त्यासंबंधी प्रभू सांगतात-" ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरल गा माझिय वाहणी । तेव्हांचि तयांची चिंतवणी | मजाचे पडली ॥ ..... आपुली तहानभूक नेणें | तान्हया निकें तें माउलीसीच करणें । तेसे अनुसरले जे मजं प्राणें । तयांचे सर्व मी करी ॥ ऐसा मनीं जो जो धरिती भावो । ता तो पुढा पुढा लागे देवो ” अशी प्रभूच्या प्रेमळ सृष्टीत व्यवस्था असल्यामुळें भक्तांनी हातांत माती धरली तरी त्याचे सोनें होऊन जाते. त्यांना संसाराची चिंता काडीभर देखील करावी लागत नाहीं. भाव मात्र दृढ हवा! " मज होत कां विपत्ती । पांडुरंग राहो चित्तीं ” अशी दृढ श्रद्धा हवी. परीक्षा पहाण्यासाठीं वर वर दुःखाचे डोंगर कोसळतील, नैराश्याच्या हद्दीवर जाऊन उभें राहावे लागेल, सर्वस्वाचा होम होईल, पण रुक्मिणीसारखी, सुदाम्यासारखी, विदुरासारखी तुकोबासारखी