या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कत देण्यास, ग्रंथकाराचें मन बरेच उदार असावे लागते. एकंदरीत या ठिकाणी, खऱ्या माहितीच्या अभावीं, बऱ्याच गोष्टी संशयास्पद राहण्याचा संभव आहे; तथापि येवढे मात्र खरें आहे की, ज्याअर्थी लॉर्ड लेकसारख्या महायोद्धयास चार वेळ माघार घ्यावी लागली, त्याअर्थी जाट लोकांनी या युद्धांत, चांगलेच युद्धचातुर्य दाखविले असले पाहिजे, हे उघड आहे. हे भरतपूरचे युद्ध होण्याच्या पूर्वी, हिंदुस्थानचें सार्वभौमत्व आपल्या हाती यावे ह्मणून इंग्रज लोकांनी अनेक राजकारस्थाने सुरू केली होती. या वेळी, देशांत जे दुर्बळ लोक होते, ते इंग्रजांस मुकाट्याने शरण येत होते. परंतु जे आपणांस बलवान् ह्मणवीत असत व दुसऱ्याच्या स्वाधीन होण्यापेक्षा मरण आलेले चांगले असा अभिमान बाळगीत असत, त्यांच्या व इंग्रजांच्या रोज झटापटी होत होत्या. अशा अभिमानी पुरुषांपैकींच यशवंतराव होळकर हे एक होत. त्यांनी इंग्रजांस पुष्कळ लढाया दिल्या, परंतु इंग्रजांच्या कवाइती फौजेपुढे त्यांच्या लष्कराचें कांहीं चालले नाही. शेवटी, त्यांस, भरतपुरच्या राजाचा आश्रय करणे भाग पडले. मथुरेपासून १४ मैलांवर, डीग या नांवाचा जो सुप्रसिद्ध किल्ला आहे, त्याचा होळकरांनी आश्रय केला होता, परंतु तेथेही त्यांस हार खावी लागल्यामुळे, ते आपल्या फौजेसह भरतपुरच्या राज्यांत आले व भरतपूरच्या राजाने त्यांस साहाय्य करण्याचे कबूल केले. त्या वेळी, होळकरांचा पाठलाग करणाऱ्या इंग्रजी सैन्यावर, भरतपुरच्या राजानें तोफांचा भडिमार केल्यामुळे त्यास तेथून जाणे भाग पडलें ! इ० स० १८०३ मध्ये, भरतपुरकर व इंग्रज यांच्यामध्ये एक तह झाला होता. या तहाची कलमें पुढे लिहिल्याप्रमाणे