पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/126

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ११९) लारंभानंतर एक दोन शतकांत केव्हां तरी झाला असावा. त्यास सप्तर्षि मघांच्या सुमारें दिसले ह्मणून त्याने शकारंभी युधिष्ठिरास २५२६ वर्षे झाली असे ठरविलें. सप्तर्षि आकाशांत ज्या प्रदेशांत आहेत तो प्रदेश बराच मोठा आहे. ते मघा, पूर्वी, उत्तरा, हस्त, चित्रा यांपैकी कोणत्याही नक्षत्री आहेत असें सांप्रत ह्मणतां येईल. त्याप्रमाणेच स्थिति गर्गवराहांच्या वेळी होती. (आणि त्यामुळेच त्यांस गति आहे अशी समजूत झाली असावी. मघांत होते असें पूर्वी कोणी सांगितले असले आणि मला पूर्वांत वाटले झणजे मला गति वाटणारच). गर्गानंतर लवकरच ( दोन तीनशें वर्षांनी) वराहमिहिर झाला. अर्थात् त्यासही तो काल खरा वाटला. तो कल्पित आहे हे वर सांगितलेंच. द्वापरान्तीं पांडव झाले असें भारतांत आहे, व ती समजूत वराहमिहिराच्या वेळी असलीच पाहिजे. वराहमिहिराचा समकालीन किंवा नुकताच पूर्वी झालेला पहिला आर्यभट याने ती मान्य केली आहे; आणि वराहमिहिर, गर्ग यांसारख्या ज्योतिष्यांनी मान्य केली नाही. यावरून द्वापरान्तीं पांडव होते हे भारतांतलें सांगणे संशयित वाटू लागते. भारतांतली युद्धकालची ग्रहस्थिति वर दिली आहे, तिजवरून रा. रा. विसाजी रघुनाथ लेले यांनी गणित करून पांडवांचा काल काढून तो शके १८०३ मध्ये वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केला. त्या कालाचा विचार करूं. लेले यांच्या ह्मणण्याचा सारांश असाः-कर्ण आणि व्यास यांच्या भाषणांत ग्रहस्थिति आहे, तींत कांहीं ग्रह दोन दोन नक्षत्रांवर सांगितले आहेत. चंद्राची स्थितिही दोन नक्षत्रांवर निवते. भारती युद्धाचा आरंभ झाला त्या दिवशींची चंद्राची स्थिति अशी सांगितली आहे: मघाविषयगः सोमस्तदिनं प्रत्यपद्यत ॥ २ ॥ __भीष्मपर्व, अ. १७. युद्धाच्या शेवटच्या ह्मणजे १८ व्या दिवशी बलराम तीर्थयात्रेहून आला तो ह्मणतो:चत्वारिंशदहान्यद्य द्वे च मे निःस्तस्य वै ॥ पुष्येण संप्रयातोस्मि श्रवणे पुनरागतः ॥ ६॥ गदापर्व, अ. ५. यावरून युद्धारंभदिवशी रोहिणी किंवा मृग नक्षत्र येते. तेव्हां महाभारतावरून युद्धकालाच्या सुमारास ग्रहांची स्थिति दोन दोन नक्षत्रांवर दिसून येते ती अशाः चंद्र-रोहिणी किंवा मृग आणि मघा. मंगळ-मघा आणि अनुराधा किंवा ज्येष्ठा. गुरु-विशाखे समीप आणि श्रवण. दोन दोन नक्षत्रांवर ग्रहांची स्थिति सांगितली आहे. यावरून त्यांतलें एक नक्षत्र सायनविभागात्मक आणि दुसरें तारारूप (निरयन) असले पाहिजे असे दिसते. या दोन दोन नक्षत्रांत ७ अथवा ८ नक्षत्रांचे अंतर आहे. यावरून सायन आणि निरयन नक्षत्रांत इतकें अंतर कधी असेल याचे अनुमान करून त्याप्रमाणे गणित करून पाहून काल कायम केला, तो शककालारंभापूर्वी ५३०६ वें (गत कलि