पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/278

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणारांस अशा टीकांचे अध्ययन फार उपयोगाचे आहे. याच्या करणावर याचा बंधु विश्वनाथ याचे उदाहरण आहे. विष्णु हा जगद्गुरु होता असें मुहूर्तचूडामणींत शिव लिहितो. शिवाय याचे वर्णन खाली विश्वनाथाच्या श्लोकांत आहेच. प्रसिद्ध टीकाकार विश्वनाथ आणि सिद्धांततत्त्वकार कमलाकर हे याच वंशांत झाले. कमलाकराने आपला कुलवृत्तांत सविस्तर दिला आहे, त्यांत पुढील श्लोक आहेत: अथात्र सार्धाबरदस्त्र२०३०संख्यपलांशकैरस्ति च दक्षिणस्यां ॥ गोदावरीसौम्यविभागसंस्थं दुर्गं च यदेव गिरीति नाम्ना ॥१॥ प्रसिद्ध मस्मानृप १६योजनैः प्राग्याम्यांतराशास्थितपाथरी च ।। विदर्भदेशांतरगास्ति रम्या राज्ञां पुरी तद्गतदेशमध्ये ॥२॥ तस्यास्त किंचित्परभाग एव सार्धद्वि २॥ तुल्यैः किल योजना ॥ गोदा वरीवति सदैव गंगा या गौतमप्रार्थनया प्रसिद्धा ॥३॥ अस्याः सतां सौम्यतटोपकंठे ग्रामोस्ति गोलाभिधया प्रसिद्धः॥ तथैव याम्य पुरुषोत्तमाख्या पुरी तयोरन्तरगा स्वयं सा ।। ४ ॥ गोदावरीसौम्यतटोपकंठगोलाख्यसद्ग्रामसुसिद्धभूमौ ॥ विप्रो महाराष्ट्र इति प्रसिद्धो रामो भरद्वाजकुलावतंसः ।। ७ ॥ बभूव तज्जोखिलमान्यभहाचायोतिशास्त्रे निपुणः पवित्रः ।। सदा मुदा सेवितभर्गसूनर्दिवाकरस्तत्तनयो बभूव ॥ ८॥ राम हा ज्योतिषी होता; भट्टाचार्य हा उत्तम मीमांसक आणि नैयायिक होता: दिवाकर हा उत्तम ज्योतिषी होता आणि तो ग्रहलाघवकार गणेशदैवज्ञाचा शिष्य होता; असें वर्णन या वंशांतील विश्वनाथ, नरसिंह, मल्लारि इत्यादिकांनी लिहिलेल्या कुलवृत्तांत आहे. दिवाकरास पांच पुत्र झाले. त्यांच्या गुणादिकांचे वर्णन विश्वनाथाने ताजिकनीलकंठीटीकेंत फार सुरस केले आहे. स्वतः विश्वनाथ या पांचांतला कनिष्ठ होय. तें.वर्णन असें: दिवाकरो नाम बभूव विद्वान् दिवाकराभो गणितेषु मन्ये ।। स्वकल्पितैर्येन निबंधवृंदैवत्धं जगदर्शितविश्वरूपं ॥ २ ॥ तस्यात्मजाः पंच समा बभूवुः पंचेंद्रकल्पा गणितागमेषु ॥ पंचानना वादिगजेंद्रभेदे पंचाग्निकल्पा द्विजकर्मणा च ॥३॥ अजनिष्ट कृष्णनामा ज्येष्ठस्तेषां कनिष्ठानां ॥ विद्यानवयवाचां बेचा स स्याज्जगत्ख्यातः ॥ ४ ॥ तस्माज्जातः कनिष्ठी विविधबुधगणाखेष्टतां प्राप जाग्रज्योतिःशास्त्रण शश्वतत्पकाटितविभवो यस्य शिष्यः प्रशिष्यः ।। विष्णुज्योतिर्विदुर्वीपतिविदितगणो भूमिदवाकरेंद्रो॥ ग्रंथव्याख्यानखर्वीकृतविबुधगुरुगर्वहा गर्वभाजां ॥ ५ ॥ आसीदासिधदासीकृतगणकगणग्रामणीगर्वभेत्ता॥ नेता ग्रंथांतराणां मतिगरनुजस्तस्य कस्पाप्यतेजाः ।। मल्लारिवादिवृंदप्रशमन विधये कोपि मल्लारिनामा ॥ व्यक्ताव्यक्तप्रवक्ता जगति विशदयत्सर्वसिद्धांतवक्ता ॥ ६ ॥ तस्यानुजः केशवनामधेयो ज्योतिर्विदानंदसमुद्रचंद्रः ॥ . वाणीप्रवीणान्वचनामृतेन संजीवयामास कलाविलासी ॥ ७ ॥ तस्यानजः संप्रति विश्वनाथो विष्णुप्रसादागुणमात्रविष्णुः ।। सर्वज्ञदैवज्ञविलाससुज्ञात् नृसिंहतः साधितसर्वविद्यः ॥ ८॥