पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/287

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ ३५ (२८८) आहे. पृथ्वीचा पृष्ठभागे जलाने व्याप्त पुष्कळ आहे आणि जलाबाहेर थोडा आहे असें यवनांचे मत आहे असें तो ह्मणतो. कोणत्याही याम्योत्तर वृत्तापासून अंशात्मक पूर्वापर जें अंतर, ज्यास सप्रित रेखांश हणतात, त्यांस त्याणे तुलांश असे नांव दिले आहे, आणि विषुववृत्तावर खालदार नामक नगर मुख्य याम्यो तर वृत्तावर कल्पून २० नगरांचे अक्षांश आणि रेखांश दिले आहेत. ते असेः-- अक्षांश तूलांश. अक्षांश तूलांश. काबूल, ३४ ४० १०४ ० अमदाबाद, २३ ० १.८२० खंबायत, २२ २० १०९ २० ब-हाणपूर, २१ . १११ उज्जयिनी, २२१११२ ० लाहोर, ३१ ५० १०९२० इंद्रप्रस्थ, १३४१८ अर्गलापूर, ११५ सोमनाथ, २२ ३५१०६ ० विजापूर, १७ २० ११८० काशी, २६ ५५ ११७ २० गोवळकोंडे, १८४ ११४१९ लखनौ, २६ ३० ११४ १३ अजमीर, २६ ५ १ ५ देवगिरि, २०३० ११. मुलतान, २९४० १०७ कनोज, २६ ३५११५ . मांडव, २७ ० १२१ काश्मीर, ३५ १०८ ० समरकंद, ३९ ४० ९९० तुरीययंत्राने वेध घेण्याचा प्रकार सविस्तर सांगितला आहे. विप्रश्नाधिकार, ग्रहणाधिकार, यांत बरेच नवीन प्रकार सांगितले आहेत. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राविबस्थांस पृथ्वीस ग्रहण लागलेले दिसेल असे सांगितले आहे. शुक्रकत सूर्यविजोत यवनांनी पाहिला आहे असें तो ह्मणतो. मेघ, गारा, भूकंप, उल्कापात यांची कारणे सांगितली आहेत. ती सर्वांशी खरी नाहीत तरी भोळसरपणाची नाहीत, खन्याच्या बरीच जवळ आहेत अंकगणित, रेखागणित, क्षेत्रविचार, ज्यासाधन यांसंबंधेही पुष्कळ नवीन प्रकार याच्या ग्रंथांत दिसून येतात. इतर सिद्धांतांत ३४३८ त्रिज्या मानून प्रति ३।। अंशांच्या मात्र भुजज्या असतात. याणे ६० त्रिज्या मानन प्रत्येक अंशाच्या भुजज्या दिल्या आहेत. त्या गणितास सोईच्या आहेत. ग्रहभोगावरून विषुवांश काढण्याकरितां सारणी दिली आहे. ही सारणी किंवा तिची रीति इतर सिद्धांतांत नसते; केरोपंती पुस्तकांत मात्र आहे. सारांश याच्या ग्रंथांत पुष्कळ नवीन प्रकार आहेत. मात्र त्यांत त्याचे स्वतःचे किती हे समजणे बरेच कठिण आहे. त्याच्या ग्रंथांत आलेले नवीन शोध वृद्धिंगत झाले नाहीत ही दुःखाची गोष्ट आहे. कमलाकराचा बंधु दिवाकर हा त्याचा गुरु होता इत्यादि वर्णन याच्या ग्रंथातील श्लोकांत वर (पृ. २८०) आलेच आहे. सावभीमकार मुनीश्वर ह्याच्याशी कमलाकराचा अत्यंत विरोध असे. दोघेही समकालीन होते. मुनीश्वराविषयीं याच्या मनांत मत्सरबुद्धि उत्पन्न होऊन त्याचा आणि भास्करग्रंथांचा हा द्वेष करू लागला की काय नकळे. मुनीश्वरानें ग्रहस्पष्टीकरणाकरितां रचिलेल्या भंगी, खंडन भंगीविभंगी या नांवाचें कमलाकराचा कनिष्ठ बंधु रंगनाथ याणे केले आहे. त्याचें प्रतिखंडन मुनीश्वराने केले आहे. (गणकतरंगिणी, पृ. ९२.)