पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/504

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१९) ते टोलमीच्या पूर्वीच्या कोणत्यचि पाश्चात्य ग्रंथांत नाही, असें पाश्चात्य ज्योतिषाच्या इतिहासांत ग्रांट* ह्मणतो. प्रतिवृत्तादिकल्पना हिपार्कसची असावी असें ह्मणण्याचा व्हिटने आणि कोलब्रूक यांचा कल दिसतो. तथापि हिपार्कसचा पंचग्रहस्पष्टीकरणावर ग्रंथ नाही हे स्पष्ट दिसते. यावरून पंचग्रहांची मंदशीघ्रपरमफलें हिपार्कसच्या ग्रंथावरून आह्मीं घेतलीं असें ह्मणण्यास जागाच नाही. वर्षमान हिपार्कसचे व टालमीचे एकच आहे. क्रांतिवृत्ततिर्यकत्व टालमीनें हिपार्कसचें घेतले असा व्हिटनेचाही अभिप्राय आहे. सूर्यमंदोच्च आणि रविपरमफल टालमीने हिपार्कसचेंच घेतले असावें असें मी दाखविलें आहेच. आणि यांतील कोणतेही मान आमच्या ग्रंथांत मुळीच नाही. तसेंच चंद्रसूर्यांचे परम लंबन हिपार्कसचें व आमचे एक नाही. (पृ०४४३ ). कोलबूक ह्मणतो की हिंदु चांद्रमासाचें मान जितकें शुद्ध आहे तितकें ग्रीकांस कधीच साधलें नाहीं. वेधयंत्रांसंबंधेही आह्मी हिपार्कस व टालमी यांपासून कांही घेतलें नाहीं असें वेधप्रकरणांत दाखविलेंच आहे. यावरून हिपार्कस आणि टालमी यांचें जें जें ह्मणून उपलब्ध आहे त्यांतून प्रतिवृत्तिकल्पनेशिवाय आह्मीं कांही घेतले नाही, हे निर्विवाद आहे. याबद्दल आणखी महत्वाची प्रमाणे अशी:-हिपार्कस आणि टालमी या दोघांस अयनचलन माहीत होते, व त्यांनी त्या गतीचे वर्षमान ३६ विकला ठरविले होते. परंतु आमच्या पहिल्या ज्योतिषग्रंथांत अयनचलनाची कल्पनाच नाहीं; मागाहून ते आह्मीं स्वतंत्रपणे काढिले आणि त्याचे वर्षमान सुमारे ६० विकला ठरविलें. आमचें ज्योतिषशास्त्र केव्हाही बनो; तें बनण्यापूर्वी हिपार्कस आणि टालमी यांचे ग्रंथांची आरास माहिती असती तर त्यांतली अयनचलनकल्पना आणि अयनगतिमान ही आमच्या पहिल्या ग्रंथांत आल्यावांचून कशी राहतीं? दुसरे एक प्रमाण असें की मंदोच्चांस गति आहे हे टालमीस माहीत नव्हते. आमच्या ग्रंथांत त्यांस गति मानली आहे व त्याप्रमाणे ती आहे असें सांप्रत सिद्ध झाले आहे. तिसरे असें की ग्रीक ज्योतिषांत रेखागणिताचे फार माहात्म्य आहे, आमच्यांत मुळीच नाहीं (वर व्हिटनेचा अभिप्राय पहा). यावरून हिपार्कस आणि टालमी या दोघांच्या ग्रंथांवरून आह्मीं कांही घेतले असल्यास प्रतिवृत्तपद्धती खेरीजकरून आह्मीं कांहीं घेतलें नाहीं असें सिद्ध होतें. ग्रीकांपासून आह्मीं कांही घेतले असेल तर ते टालमी आणि हिपाफस या दोघांच्या पूर्वीच घेतले असले पाहिजे. परंतु हिपार्कस आणि टालमी यांच्या पूर्वी ग्रीकांचे होते काय? रविचंद्रस्पष्टीकरण आणि पंचग्रहस्पष्टीकरण ही कायती ज्योतिषांत महत्वाची गोष्ट. तिचे ज्ञान हिपार्कसच्या पूर्वी पाश्चात्यांस मुळीच नव्हते असे सर्व युरोपिअन कबूल करितात. आणि

  • Grant's History of Ph. Astronomy, Oh. XVIII पहा. व मागें (पृ. ५०६) थीबोचा अभिप्राय पहा. + Algebra, Intro p. XXII. + प्रतिवृत्तपद्धतीबद्दल विचार पुढे करूं. ६.३६० टीप पहा.