पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




४. महाभारतातील प्रवृत्तिधर्म

प्रवृत्तिधर्म
 हलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाचे मोक्ष किंवा आत्मकल्याण हे अंतिम साध्य आहे असा भारतीय तत्त्ववेत्त्यांचा सिद्धांत आहे. मनोनिग्रह, तप व ज्ञान या साधनांनी प्रत्येक सुबुद्ध मानवाने मोक्ष प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे हेच त्याचे श्रेष्ठ कर्तव्य होय असे एकमुखाने या पुरुषांनी सांगितले आहे. त्यांच्या मते मोक्षसुख किंवा ब्रह्मानंद हा सर्वांत उच्चप्रतीचा आनंद असून त्याच्या प्राप्तीने मानव हा जन्ममरणाच्या दुःखद चक्रातून सुटून जातो व त्याला पुन्हा दुःखाचा स्पर्शही होत नाही. म्हणून ते अतिशय श्रेष्ठ प्रकारचे सुख दीर्घ प्रयत्नाने प्राप्त करून घेऊन प्रत्येकाने आपल्या आत्म्याचे कल्याण साधून घेणे हेच कर्तव्य होय, हा परमधर्म होय असे भारतीय तत्त्ववेत्त्यांचे निश्चित मत आहे.

मोक्षाचे स्थान

 मोक्ष हे प्रत्येक मानवाचे अंतिम साध्य आहे हा सिद्धांत भारतीय तत्त्ववेत्त्यांचा म्हणून सांगितला जातो हे सर्वथैव युक्त