पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१३५
 

विस्ताराने वर्णिलेले आहे. आता शेवटच्या भागात प्रवृत्तिधर्माला कोणत्या प्रकारची मनोवृत्ती त्यांच्या मते अवश्य आहेत यासंबंधी त्यांनी जे विवेचन केले आहे ते सांगून हे प्रवृत्तिधर्मप्रकरण संपवितो.

व्यक्तिधर्म व राष्ट्रधर्म

 गृहनीती व परनीती असे नीतीचे दोन भाग करून भिन्न क्षेत्रात भिन्न धर्म कसे ग्राह्य असतात ते मागील प्रकरणी सांगितलेच आहे. तोच विचार येथेही केला पाहिजे. ज्यांना केवळ मोक्षाचीच इच्छा आहे, राष्ट्ररक्षणाची काळजी जे वाहत नाहीत किंवा जे ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध होऊन केवळ आत्मज्ञानाच्याच उपासनेत आहेत, किंवा विशिष्ट प्रकारच्या वृत्तीमुळे जे काही कारणाने जगाच्या प्रपंचाबद्दल उदासीन आहेत त्यांचा धर्म एक प्रकारचा होईल. पण ज्यांना पराक्रमाची आकांक्षा आहे, राष्ट्र वैभवास चढविण्याचा उद्योग ज्यांनी आरंभिला आहे, ज्यांच्या दुर्दम्य शक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत, जगताच्या उलाढाली पाहून, त्यात उडी टाकून वैभवाच्या शिखरावर आपण आरोहण करावे अशी ज्यांना प्रेरणा होत असते त्यांचा धर्म निराळा. निर्मत्सर वृत्ती, संतोष, भोळी वृत्ती, षड्रिपूंचा तिटकारा हा उपदेश पहिल्या प्रकारच्या लोकांना युक्त आहे. पण विजिगीषू, जयिष्णू परंतप वीरांना तो अगदी त्याज्य होय. म्हणून महाभारतात असंतोष, संताप, साहस, सावधानता, प्रतिकारबुद्धी यांची ठायी ठायी प्रशंसा केलेली आढळते.

क्षत्रियस्य हि धर्मोऽयं हन्यात् हन्येत वा पुनः ॥

-७।१९७।३८

 एकतर मारावे नाही तर मरून जावे हाच क्षत्रियधर्म होय; 'परं