पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

भारतीयांच्या कल्याणासाठी या राष्ट्रीय ग्रंथात ग्रथित करून ठेवला आहे. या सूर्यप्रकाशाच्या साह्याने आपण आपला मार्ग आखला तर भारताचे प्राचीन काळचे वैभव आजही प्राप्त करून घेणे आपल्याला फार कठिण नाही.

राष्ट्रधर्म व विश्वधर्म

 महाभारतात सांगितलेला धर्म हा व्यवहारधर्म आहे, राष्ट्रधर्म आहे. ते प्रपंचविज्ञान आहे. राष्ट्रीय प्रपंच यशस्वी करावयाचा असेल तर त्याचाच अवलंब करणे अवश्य आहे. विश्वधर्म, मानवताधर्म हा याहून अगदी निराळा. त्याची तत्त्वे राष्ट्रीय प्रपंचात शिरली तर समाजाचा अधःपात होतो. नाश होतो. संतांच्या काळात हेच झाले, शिव-समर्थांनी त्यातून महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला सोडविले. त्यानंतर ब्रिटिशांच्या राज्यात जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्यात प्रारंभी धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे, गृहनीती व परनीती या भिन्न आहेत हा विवेक जागरूक होता. पण महात्माजींच्या काळात आपल्या राजकारणात, आपल्या राष्ट्रीय प्रपंचात पुन्हा विश्वधर्म, मानवताधर्म यांतील तत्त्वे घुसली. पण महात्माजींनी पुढे स्वतःच त्यांना मुरड घातली आणि वल्लभभाई, सुभाषचंद्र, यांनी तर त्या तत्त्वांना क्षणमात्रही थारा दिला नाही. तरीही फाळणीच्या रूपाने त्या सत्यअहिंसेच्या व्यापक अराष्ट्रीय धर्माची किंमत आपल्याला द्यावीच लागली. आज स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपल्या राष्ट्रीय प्रपंचावर पुन्हा विश्वधर्माची काळी छाया घनदाट पडू पहात आहे. पंचशील, जगत्कल्याण, विश्वशांती यांवरील पंडित जवाहरलालजी यांची स्वहितनिरपेक्ष निष्ठा, चीन-पाकिस्तान यांच्या नेत्यांच्या सद्भावने