पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१३९
 

वरील त्यांची श्रद्धा, त्यांच्याविषयी भारतीयांच्या चित्तात अणुमात्र संताप येऊ न देण्याविषयीची त्यांची दक्षता, दरवेळी शत्रुपक्षालाच झुकते माप देण्याची त्यांची वृत्ती, लष्करी बळ आम्ही कधीही वापरणार नाही अशी शत्रूला त्यांनी दिलेली अभिवचने, लष्करी कराराने मित्रराष्ट्रे जोडून ठेवण्याला त्यांचा विरोध, ही सर्व विश्वधर्माची लक्षणे आहेत. त्यांनी विश्वाचे कल्याण किती होईल याविषयी शंका आहे. पण भारताचे अकल्याण होईल, होत आहे याविषयी शंका नाही. अशा वेळी महाभारतातील राष्ट्रधर्माच्या तत्त्वांचा आपण अभ्यास केला व त्याचा अवलंब केला तर विश्वधर्माच्या आपत्तीतून आपला देश मुक्त होईल अशी आशा करण्यास बराच आधार निर्माण होईल असे वाटते.

● ● ●