पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

आपल्या प्राचीन ऋषींचा निर्वाळा आहे असे एक मत प्रचलित आहे. पण ते भ्रामक आहे. महाभारतात सर्वस्वी ग्रंथप्रामाण्य न उपदेशिता अनेक ठिकाणी बुद्धिप्रामाण्याचीही प्रशंसा व उपदेश केलेला आढळतो. श्रुतीमध्ये सर्व गोष्टी सांगणे शक्य नाही. प्रत्येक प्रसंगाची, त्या वेळच्या परिस्थितीची व त्या वेळच्या सत्यासत्याची कल्पना श्रुतींच्या तत्त्ववेत्त्यांना येणे शक्य नाही हे भारतीय तत्त्ववेत्ते जाणून होते. त्याचप्रमाणे श्रुतीत परस्परविरोधी वचनेही सापडतात व त्यामुळे गोंधळ होतो, कार्याकार्य ठरत नाही हेही त्यांनी लक्षात घेतले होते. आणि म्हणूनच सर्व काही श्रुतिवचनाप्रमाणेच झाले पाहिजे. असा आग्रह त्यांनी अनेक ठिकाणी सोडून दिल्याचे आपणांस दिसून येते. श्रुतिवचनाबरोबरच कार्याकार्यनिर्णयात त्यांनी वृद्धांच्या वचनालाही प्रामाण्य दिलेले आढळून येते. आणि याही पुढे जाऊन ज्ञानसंपन्न पुरुषाने कठिण प्रसंगी स्वतःची बुद्धी चालवून तिला पटेल तो निर्णय करावा असेही त्यांनी सांगितले आहे.
 सत्यासत्य- निर्णयाचा विचार चालू असताना भीष्म युधिष्ठिरास सांगतात, 'हे भारता, श्रुतीत जे जे सांगितले आहे तो तो धर्म होय असे कित्येकांचे मत आहे; व दुसऱ्या लोकांच्या मते तो सर्वच धर्म होय असे नाही. या दुसऱ्या प्रकारच्या मतांचा आम्ही- द्वेष करीत नाही. कारण श्रुतीमध्ये प्रत्येक गोष्ट सांगितलेली असणे शक्य नाही. (शांति. अ. १०९) शिबिराजापुढे धर्माधर्म-निर्णयाचा एक बिकट प्रश्न येऊन पडला होता. एका कपोत पक्ष्यामागे एक ससाणा लागला होता. त्या वेळी कपोत या राजाच्या आश्रयास आला व राजाने त्यास अभय दिले. मागून ससाणा आला व आपले भक्ष्य राजाजवळ मागू लागला. राजा कपोताला त्या