पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
४९
 

करीत नाही. मथितार्थ येवढाच आहे की क्षत्रियाचीही योग्यता केवळ जन्मावर अवलंबून ठेवलेली नव्हती.
 ब्राह्मण किंवा क्षत्रिय हे प्रथमतः जन्मामुळे ब्राह्मण किंवा क्षत्रिय ठरत असले तरी त्यांचे खरे ब्राह्मणत्व किंवा क्षत्रियत्व हे त्यांच्या कर्मावरच अवलंबून आहे. असे महाभारतकारांचे मत होते हे यावरून निःसंशय दिसते. पण याहीपेक्षा त्यांचे विशेष अभिनंदनीय धोरण, त्यांनी क्षत्रिय ब्राह्मणांमध्ये काडीचीही उच्चनीचता नाही, दोन्ही वर्ण पूर्णसम आहेत, हे तत्त्व प्रस्थापित करण्याचा जो अट्टाहास केला आहे, त्यात दिसून येते.
 'ब्राह्मण व क्षत्रिय हे राष्ट्राचे सारखेच पालक आहेत', 'ब्राह्मणाचे भाग्य क्षत्रियावर व क्षत्रियाचे ब्राह्मणांवर अवलंबून आहे', 'समाजाला दोघांचीही अत्यंत जरूर आहे' असे विचार महाभारतात अनेक ठिकाणी आहेत. राजा म्हणजे प्रत्यक्ष देवच असेही सांगितलेले आहे, त्याचप्रमाणे ब्राह्मण हेही देव आहेत असेही म्हटलेले आहे. ब्राह्मणांची उत्पत्ती क्षत्रियापासून झाली असे म्हणून लगेच क्षत्रियांची उत्पत्ती ब्राह्मणापासून झाली असेही मत व्यक्त केले आहे. धर्मविवेचन करताना मात्र क्षात्रधर्म सर्वांत श्रेष्ठ असे अनेकवार सांगितले आहे आणि ते युक्त कसे आहे याचे विवेचन अन्यत्र केले आहे.
 मुचकुंदाने कुबेराचा पराभव केल्यावर त्यास सांगितले की, "ब्राह्मण व क्षत्रिय हे ब्रह्मदेवाने सख्खे बंधूच निर्माण केले आहेत. त्यांचे सामर्थ्य व उद्योग ही अलग अलग झाली तर प्रजेचे पालन होणार नाही. तप व मंत्र यांचे बल सदैव ब्राह्मणांच्या ठायी निश्चलपणे वास्तव्य करीत असते आणि अस्त्रबल व बाहुबल ही क्षत्रियांच्या ठायी सदैव स्थिरपणे राहात असतात. ब्राह्मण व
 ४...