पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




३. महाभारतातील व्यवहारनीती अथवा
राजनीतिशास्त्र

व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
 भारताच्या राष्ट्रीय प्रपंचात सध्या अनेक बिकट समस्या निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानावर व भारतातील पाकिस्तानी वृत्तीवर आपण किती गाढ प्रेम करावे, पाण्याच्या प्रश्नात, कर्जाच्या प्रश्नात, आपल्या देशातून पाकिस्तानला लोहमार्ग करून देण्याच्या प्रश्नात स्वराष्ट्राचे अहित करूनही प्रत्येक वेळी पाकिस्तानला झुकते माप किती द्यावे, एकपक्षी करार किती पाळावे, केवळ शब्द दिला होता म्हणून बेरुबारीचा टापू पाकिस्तानला देणे योग्य आहे काय, रशिया, चीन यांच्या राज्यकर्त्यांवर किती विश्वास ठेवावा, आपल्या व्यापाऱ्यांना चीनने उधळून लावले असतानाही भारतातील चिनी व्यापाऱ्यांवर आपण किती प्रेम करावे, चीनने आक्रमण केले असताना चीनशी सहानुभूती दाखविणाऱ्या लोकांना अत्यंत महत्त्वाची सरकारी अधिकारपदे द्यावी की नाही; नेपाळ, भूतान येथील कटकटी दूरदृष्टीने जाणून त्यांना भारतात सामील करून टाकणे इहलोकी व परलोकी