पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
७१
 

करावे.'- (शांती ९३). 'जो राजा उत्कृष्टपणे वागणाऱ्या लोकांशी असत्याचरण करतो त्याचा आत्मा परशूच्या योगाने छिन्न झालेल्या वनाप्रमाणे त्या कर्माच्या योगाने क्षीण होतो.'
 गृहनीतीत राजापुढे हे जसे विशाल व उदात्त ध्येय ठेविलेले आहे त्याचप्रमाणे व्यक्तीपुढेही ठेविलेले आहे.

भुञ्जते ते त्वधं पापा ये पंचन्त्यात्मकारणात् । ६,२७,१३

 'जे केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवितात ते पातकी लोक त्या अन्नाच्या रूपाने पापच भक्षण करितात.'
 ही शिकवण फारच उदात्त अशी आहे. आपण अन्न खात असताना आपल्या अनाथ, दरिद्री बांधवांची आठवण ठेविली पाहिजे, न ठेवणे हा मोठा अधर्म होय असे येथे सांगितले आहे. मानवधर्माचे हे खरोखर सारच आहे. परनीतीत अहिंसा, सत्य या तत्त्वांना मर्यादा पडतात असे सांगितले असले तरी गृहनीतीत तसा प्रकार मुळीच नाही. 'अहिंसा, सत्य भाषण, सर्वांशी सरळपणाची वागणूक, क्षमा व सावधानता हे गुण ज्याच्यापाशी असतील तो सुखी होईल' असा येथे उपदेश आहे. -(शां.२१५). 'आपल्याला अनिष्ट अशी गोष्ट असेल ती दुसऱ्याच्या संबंधाने करू नये. धर्माचे संक्षिप्त स्वरूप हे असे आहे. याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय.' (१३-११३-८) 'मृत्युलोकी प्राणांपेक्षा प्रियतर असे काही नाही. यास्तव मनुष्याने स्वतःप्रमाणेच दुसऱ्यावरही दया करावी ' (१३, ११६) 'सत्याइतका श्रेष्ठ धर्म नाही. सत्याइतके श्रेष्ठ काही नाही, आणि असत्यापेक्षा अधिक भयंकर असे काही नाही. आपणावर दुसऱ्याने केलेला उपकार जो स्मरत नाही त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते' -(७, १८३, २८). 'पृथ्वीवर हिंडणारे क्षुधित लोक ज्या शूर