पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

दानपतीपाशी आले असता संतुष्ट होऊन पुढे जातात त्याच्या धर्मापेक्षा कोणता धर्म अधिक आहे?" अशा तऱ्हेची अनेक अमृतवचने महाभारतात पदोपदी सापडतात.
 भारतात ज्या अनेक कथा आहेत त्यांत जाती पंथ, प्रांत, यांच्या अतीत असलेल्या मानवधर्माची उदात्त शिकवण देणाऱ्याही पुष्कळ कथा सापडतात. शिबी अथवा उशीनर नावाच्या धर्मनिष्ठ राजाची कथा अशीच आहे. ससाण्याच्या भीतीने कपोत पक्षी त्याच्या आश्रयास आला. त्या वेळी शिबिराजाने कपोताला अभय दिले. मागून ससाणा आला व 'माझे भक्ष्य परत दिले नाहीस तर तुला अधर्म घडेल,' असे राजाला म्हणू लागला. राजापुढे मोठा पेच येऊन पडला. तरी त्याने शरणागताला अभय देण्याचे आपले थोर व्रत सोडले नाही. त्याने कपोताऐवजी आपल्या शरीरातील मांस घेण्याविषयी श्येनपक्षाला विनविले. त्याने ते मान्य करताच राजाने आपल्या शरीराचे मांस काढून तागडीत टाकण्यास सुरुवात केली आणि ते कपोताच्या वजनाइतके भरत नाही असे दिसताच त्याने आपला सर्व देह तागडीत ठेवून श्येनपक्ष्याला संतुष्ट केले.
 शरणागताला दिलेले वचन पुरे करण्यासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या शिबिराजाची ही कथा अतिशय उदात्त तर आहेच, पण व्याधाच्या क्षुधाशमनार्थ आपला देह अर्पण करणाऱ्या कपोत पक्ष्याची कथा त्याहीपेक्षा उदात्त आहे.

उदात्त मानवधर्म

 एकदा एका अरण्यात भयंकर वादळ झाले व प्रचंड वृष्टी झाली. पंचमहाभूतांनी इतके कराल रूप धारण केले की, सर्व जीवसृष्टी भयविव्हल होऊन गेली. अशा वेळी अनेक पक्षी घरट्यातून खाली पडले. त्यांतच एक कपोत पक्षिणीही पडली. त्या अरण्यात एक