पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




१. महाभारतातील धर्मशास्त्र

प्रस्तावना
 प्रत्येक राष्ट्राच्या संसारामागे त्यांचे एक स्वतंत्र असे तत्त्वज्ञान असते. नीती, राजकारण, धर्म, इहपरलोकींचे यश, स्वकीय परकीय यांशी वागणूक, ध्येय व्यवहार यांच्या मर्यादा, व्यक्ती व समाज यांचे परस्परांशी संबंध यासंबंधीचे काही सिद्धान्त त्या त्या राष्ट्रातील थोर पुरुषांनी निश्चित केलेले असतात; आणि साधारणतः त्यांचे व त्यांच्या राष्ट्रातील बहुजन समाजाचे वर्तन त्या धोरणाने होत असते. हे जे निश्चित झालेले सिद्धान्त त्यांचे समर्थनहि त्या विचारी पुरुषांनी केलेले असते. हेच सिद्धान्त ग्राह्य का, इतर त्याज्य का, यानेच आपल्या समाजाचे कल्याण कसे होईल, ते सोडल्याने नाश कसा होईल यासंबंधी ते नित्य मीमांसा करीत असतात व लोकांना ती पटवून देत असतात. हे जे त्या त्या राष्ट्रातील विचारी पुरुषांनी निश्चित केलेले सिद्धान्त, त्यांचे समर्थन व त्यांची मीमांसा या सर्वाला त्या राष्ट्राचे तत्त्वज्ञान असे म्हणतात.
 माणसाचा पराक्रम रक्तावर अवलंबून असतो, या रक्तात नॉर्डिक रक्त श्रेष्ठ आहे, या रक्ताचे लोक ते श्रेष्ठ, बाकीचे हीन, म्हणून