पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
७९
 

वस्त्रे, शय्या, आसने, गृहे, रस, सुगंधी पदार्थ आणि फळे यांवर तू शत्रूची आसक्ती निर्माण कर. त्यायोगे त्यांचा नाश होईल. हे राजा, मोठमोठी मूल्यवान उपवने, मंदिरे, शय्या यांवर शत्रूची आसक्ती निर्माण करून त्या उपभोगसुखांच्या योगाने तू त्याचा खजिना रिकामा कर.' -(शां. १०५.).
 शत्रूला दयाबुद्धी दाखविणे, त्यांशी वागताना न्यायनीतीचा विचार करणे किती घातुक आहे हे भीम व दुर्योधन यांच्या अखेरच्या गदायुद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने पांडवांना जो उपदेश केला व त्यांच्या कृत्याचे जे समर्थन केले त्यावरून चांगले समजून येईल.

श्रीकृष्णप्रणीत युद्धनीतीचे स्त्ररूप

 प्राणाचे भय घेऊन दुर्योधन शेवटी एका डोहात लपून बसला होता. काठावरून युधिष्ठिर त्याच्याशी बोलत होता. त्या वेळी युधिष्ठिराने दुर्योधनाला सांगितले की, 'मी तुला सवलत देतो. पाच पांडवांपैकी ज्याच्याशी युद्ध करावे अशी तुझी इच्छा असेल, त्याच्याशी तू, गदायुद्ध कर. आणि त्या एकाला जरी तू मारलेस तरी सर्व राज्य तुझे आहे.' ही सवलत ऐकून दुर्योधन बाहेर आला. पण इकडे श्रीकृष्ण मात्र धर्माच्या या आत्मघातकी उदारतेने अगदी संतापून गेले. ते म्हणाले, 'युधिष्ठिरा, हे तू काय करून ठेवलेस ? अरे युद्धात तू, अर्जुन, नकुल किंवा सहदेव यांपैकी कोणाला त्याने निवडले तर कसे होईल ? त्याच्याशी सामना करण्यास तुम्ही मुळीच समर्थ नाही. रणात दुर्योधनाला प्रतियोद्धा पृथापुत्र वृकोदरावाचून तर मला कोणीच दिसत नाही. असे असताना तू हे काय कबूल करून बसलास ? हे राजा, तू केवळ दयाबुद्धीने हे साहस