पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

 पण क्षमा किंवा शिक्षा हे सर्व प्रसंगावर व तारतम्यावर अवलंबून राहील. शत्रू हा पुन्हा उचल करणार नाही ही निश्चिती करून घेतली पाहिजे हा त्यातला भावार्थ म्हणून भारतकार म्हणतात ऋण, अग्नी आणि शत्रू यांचा जर अवशेष ठेवला तर ती पुनः पुनः वृद्धिंगत होतात. यास्तव त्यांचा शेष ठेवू नये. शत्रू अवशिष्ट ठेवले तर त्यांचा अपमान झाला असल्यामुळे ते पुढे अत्यंत भीती उत्पन्न करितात. म्हणून शत्रूने हृदयाला पाझर फोडण्यासारखे उद्गार काढले तरीही त्याला सोडू नये व त्याच्याविषयी दुःख बाळगू नये. पूर्वी त्याने आपणास पीडा दिली असेल तर त्याचा वधच करावा. मात्र परकीयांना वश करण्याचा व त्यांजवर अनुग्रह करण्याचा प्रयत्न राजाने सदैव करावा, पण प्रसंगानुसार त्यांचा निग्रहही करावा.

प्रहरिष्यन् प्रियं ब्रूयात् प्रहरन्नपि भारत ।
प्रहृत्यच कृपायीत शोचेत च रुदेत च ।

-(आदि. १४०/५६)

 शत्रूवर प्रहार करण्याचे मनात असता वरकरणी त्याच्याशी गोड बोलावे. प्रहार करीत असतानाही गोडच बोलावे. आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयी सहानुभूती दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेही.
 राजा अशा सौम्य वर्तनाने शत्रूचा उच्छेद करता येतो. सौम्य उपायांनी भयंकर अशा शत्रूचाहि वध करता येतो. वरीलसारख्या सौम्य उपायाला असाध्य असे काहीच नाही. कारण जो सौम्य असतो, तोच अतिशय तीक्ष्ण असा उपाय आहे. -(शांति. १४०)
 शत्रूशी कपट करून त्याला फसविणे, संकटात गाठून त्याचा संहार करणे व करतानाही त्याच्याबद्दल बाह्यतः सहानुभूती