पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
९१
 

नित्यं विश्वासयेत् अन्यान | परेषां तु न विश्वसेत् ।

–(शां. १३८)

 आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनांत नेहमी विश्वास उत्पन्न करावा, आपण मात्र दुसऱ्यावर कधीही विश्वास ठेवू नये. सारांश, कोणताही प्रसंग आला तरी आपल्या जीविताचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे अविश्वास हेच राजनीतिशास्त्राचे संक्षिप्त व मुख्य स्वरूप होऊन बसते. मनुष्यावर अविश्वास ठेवून राहणे हेच आपल्या विपुल हिताचे साधन आहे. विश्वास न ठेवून वागणारे लोक दुबळे जरी असले तरी ते शत्रूकडून बद्ध होत नाहीत. व विश्वास ठेवून वागणारे लोक बलाढ्य असले तरी दुर्बल असे शत्रू त्यांना बद्ध करू शकतात.
 कोणाही दोन पुरुषांचे प्रथम परस्परांशी वैर असले, व नंतर काही कारणामुळे ते परस्परांवर उत्कृष्ट प्रीती करू लागले, व कार्य झाल्यावर त्यांच्या मनांत परस्परांना फसविण्याचा विचार आला तर सुज्ञ मनुष्य उत्कृष्ट प्रकारच्या बुद्धीचा आश्रय करून दुसऱ्याला फसवितो. मनुष्य जरी ज्ञानसंपन्न असला तरी तो जर बेसावध राहिला तर अज्ञ लोकही त्याला फसवू शकतात. म्हणूनच प्रमाद न होऊ देता, अंतःकरणात भीती वाटत असली तरी, ती वाटतं नसल्याप्रमाणे, व विश्वास नसला तरी तो असल्यासारखा दाखवून मनुष्याने वागावे. हे प्रजाधिपते, प्रसंगानुसार शत्रूशीही संधि करावा व मित्राशीही संग्राम करावा असेच संधिवेत्ते लोक सदैव सांगत असतात. हे जाणून व शास्त्रांची तत्त्वे लक्षात घेऊन कार्यामध्ये आसक्त व प्रसन्न राहून संकट येण्यापूर्वीच त्याची भीती उत्पन्न झाल्याप्रमाणे वागावे व भीतिग्रस्त मनुष्याप्रमाणे दुसऱ्याचा आश्रय करावा व संधीही करावा. अंतःकरणात भीती