पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आतां, सर्व शास्त्रांत, ऐहिक व पारमार्थिक सुखोत्प- त्यांचें धर्मशास्त्र. त्तीच्या संबंधानें, धर्मशास्त्र हे शिरो- भागी होय. सबब तत्संबंधींच आपण प्रथमतः विचार करूं. धर्मशास्त्र. त्यांतील मूलतत्वें. सर्व सुधारलेल्या देशांत, आणि प्रत्येक समन्जस व उन्नत्तीप्रत पावलेल्या राष्ट्रांत, सामा- जिक व्यवस्था उत्कृष्ठ रीतीनें, व अबाधित, आणि यथान्याय चालावी यासाठीं, धर्मशास्त्राचें अवलंबन करण्याची मोठीच अवश्यकता असते. हें धर्म- शास्त्र ह्मटले ह्मणजे मुख्यत्वेंकरून ईश्वरनिष्ठा, नीतिनै- पुण्य, व्यवहारदाक्षिण्य, संप्रदायपटुत्व, आणि आचार- शीलन, इत्यादि मूलतत्वांचें एकीकरण, किंवा विन्यास होय. आह्यां हिंदूंचें धर्मशास्त्र विन्यासरूपानें इसवी सनापूर्वी, नऊशें किंवा दहाशें वर्षे उदयास आलें असून, या भूतलावर तें सर्वांत जुनें अ- सल्याचें समजतें. तथापि, त्यांतील तत्वांचें बीजारोपण सद कालाच्याही फारच अगोदरचें असून, तें वेदांत, आणि विशेषतः सूत्रांत, स्पष्टपणें व्यक्त होतें. आतां वेद चार असून, या वेद चतुष्टयासच समुच्चय रूपानें श्रुति अर्से त्यांचा विन्यास.