पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१वा ] वेदान्तशास्त्र समुदायरूपानें मोक्षाचीं साधनें असून, त्यांपैकी एखादेंही उणें असल्यास मोक्ष होत नाहीं, असें हें मतवादी समजतात. या धर्माचा प्रवर्तक प्रसिद्ध अर्हत् नामक होऊन जैनमताचा प्रवर्तक गेला. त्याचें जन्म बहार प्रांतांत अर्हत् नामक आचार्य, पाटणा शहरीं झाले असून त्याचा व त्याचा काळ. काल बुद्धानंतरचा असल्याविषयीं अनुमान आहे. हिंदूंची तत्वान्वेषण जिज्ञासा व तिचा काल. हिंदूंची ही तत्वान्वेषण जिज्ञासा आजकालची नमून, तिचें बीज फारच पौराणिक कालां- तलें आहे. आणि त्याविषयीं शोध- कबुद्धीने पाहिले तर आपणास असें कळून येईल कीं, सृष्टीच्या आदिकारणाचे गहन वि- चार, व तत्संबंधी उहापोह हे अतिपुराण वैदिक कालांतही चाललेले असून, त्यांविषयीं त्यावेळी देखील प्रचंड भवति न भवति होत असे. ऋग्वेद संहितत, अरण्यकांत, आणि उपनिषद् भागांत, तत्संबंधीं पूर्ण- त्वाचे विचार क्षणोक्षणी आढळतात. इतकेच नाहीं तर, त्या मूलनिर्झरापासूनच हल्लींचा तत्वज्ञानोदधि निर्माण झाल्याचे दिसतें; व तदवलोकनानेंच हिंदूंच्या बुद्धिप्र- गरुभतेचें सर्व जगास आश्चर्य वाटतें, आणि त्यांच्या ज्ञानाविषयी सर्वांस विस्मय होतो. प्रोफेसर वेबर असे लिहितात की:- -