पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आणि क्रमाक्रमाने दक्षिणापथांतही प्रवेश करून त्यांनी सर्व भरतखंड व्यापिलें. शाची मर्यादा. या काळचे आर्यलोकांचें स्थानांतर, आणि त्यांचें वसतिस्थळ, हीं मनांत आणिली त्यांच्या वसतिप्रदे-ह्मणजे त्यांच्या मनावर विराट् स्वरूपाचे जे जे म्हणून संस्कार झाले, त्याविषयींच्या कारणांचें दिग्दर्शन होतें. ते ज्या प्रदेशांत आनंदानें निवास करीत होते त्याच्या उत्तरेस हेमाच्छा- दित असा प्रचंड, विस्तीर्ण, व अत्युच्च, हिमालय पर्वत असून, पूर्व बाजूला अति विशाळ आणि पवित्र यमुना व गंगा या महानद्या होत्या. पश्चिम सीमेला सिंधूपमाच सिंधु नदी इतस्तत: दक्षिणोत्तर तीव्र वेगाने वाहत असून, दक्षिण बाजूला दक्षिणसमुद्र जो हिंदी महासागर तो दृग्गोचर होत असे. आतां, आमचे आर्य लोक आपला यशोध्वज फड- कावीत क्रमशः भरतखंडांत कसकसे पूर्व, उत्तर, व दक्षिण, या दिशांकडे सर्वत्र पसरत गेले, ह्याविषयीं निश्चयात्मक रीतीनें ठरविण्यास, ऋग्वेदांतील खाली दाखल केलेल्या आमच्या अतिपुराण ऋषींच्याच ज्या विश्वसनीय उक्ति, त्या उत्तम साधन होत:- तृष्टाम॑या प्रथम॑यात॑ वेस॒जूःसुसवा॑ र॒सयावे त्या