पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२वा] आर्यभाषा. नैसर्गिक स्थितीचे केवळ भाजनच होत, ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्यानें मानवी धर्मशास्त्र रचलें, आणि ज्यांनी आपली कल्पनाशक्ति पौराणिक कथानकें रचण्यांत खर्च केली, त्यांच्या अचाट मानसिक वैभवाचें आणि त्यांनी बनविलेल्या संस्कृत भाषेचें परद्वीपीयांस कौतुक वाटावें, यांत नवल ते काय ? ७७ मानवी सुखाच्या संबंधानें संस्कृत विद्येचें श्रेय. विचार केला तर संस्कृत विद्येचा अभ्यास फारच श्रेयस्कर आहे. ग्रीक व लाटिन या भाषा जरी ज्ञानदीपांनी परिप्लुत आहेत तरी, कांही कांही मह- स्वाच्या विषयांची त्यांत खचित उणीवच असून, ती संस्कृतांतील ज्ञानभांडाराशिवाय बिलकुल पुरी होणारी नाहीं. या मौल्यवान् गीर्वाण भाषेत प्रत्येक शास्त्राचें, आणि हरएक विषयाचें, शोधकबुद्धीनें व विचारपूर्वक विवेचन केलेले असल्यामुळे, पारमार्थिक व ऐहिक साधनां- च्या संबंधाने ती एक विशाल तरणी व बुद्धिदर्पणच होऊन राहिली आहे. बुद्धिमत्ता, वीरश्री, नैसर्गिक संपत्ति, आणि लावण्य, यासर्वांचे माहेरघर कोणतें आहे अशावि- षयीं सूक्ष्म विचार केला तर, या पृथिवीच्या पाठीवर भरतखंडाशिवाय दुसरा कोणताही देश, इतक्या पुरातन १ "There will be abundance of useful and most पुढे चालू.