पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

आर्यांची राज्यव्यवस्था.

विचारशून्यही असे. तथापि, त्याला आमच्या धर्माध्यक्षांचें बाह्य बंधन, व पारमार्थिक शासनाचें अंतर्गत बंधन असल्यामुळे, त्याच्या हातून अन्याय किंवा अनीतीचें आचरण होण्याचा अगदीच कमी संभव असे.
राजा ह्मणजे ईश्वरी अंश, असेंच पूर्वीपासून आमचे राजतेज. लोक मानीत आले आहेत. आणि प्रायः, ही समजूत पृथिवीच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्रांत अजून देखील आहे, असें ह्मणण्यास कांहींच हरकत नाहीं. कारण, हरएक प्रकारचें कल्याण किंवा हानि करण्याचें राजाच्या हातांतच असल्यामुळे, ईशशक्तीप्रमाणेंच त्याचें तेज सर्वत्र भासूं लागतें. आतां, मानवी स्थितींत ज्या मानानें फेरबदल होतो, ह्मणजे मनु- ष्याचें पाऊल जसजसें पुढे सरकतें, व त्याचें ज्ञान दिवसा- नुदिवस जास्त प्रगल्भ होऊन, राजा आणि प्रजा यांच्या मधलें खरें इंगित, व भेदबुद्धि, जितक्या प्रमाणानें त्याला हळूहळू कळू लागते, तितक्याच प्रमाणानें, त्याला राजां- तील ईश्वरी अंश मुळींच भासेनासा होतो. आणि वास्तविक पाहतां, असें वाटणें देखील साहजीकच आहे. कारण, वस्तुतः राजा ह्यटला ह्मणजे प्रजानिर्मितच प्रभु होय. तेव्हां उघडच, प्रजा ही जेवढे म्हणून आपले हक्क राजास देईल, प्रजाप्रभुत्व. तेवढ्यांचाच उपभोग घेण्यास तो पात्र होईल. आपल्या